PM Modi Cabinet Expansion : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार असून त्यापूर्वी मोदी मंत्रिमंडळातील नेत्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाल्यापासूनच अनेक मंत्र्यांची जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते अशा शक्यताही वर्तवण्यात येत होत्या. अशातच मोदी मंत्रिमंडळातील अनेक मोठ्या नेत्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरु झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा  राजीनामा


केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी प्रकृती अस्वास्थाचा हवाला देत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रमेश पोखरियाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून तब्येतीच्या कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी रमेश पोखरियाल यांना प्रकृती अस्वास्थामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना जवळपास 15 दिवसांसाठी आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. अशातच पोखरियाल यांनी राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांची शिक्षणमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रमेश पोखरियाल निशंक यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षणमंत्री पद रिकामं असून सिंधिया यांची वर्णी लागू शकते. 


आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा राजीनामा 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही मोदी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. सध्या हर्षवर्धन हे दिल्लीतील चांदनी चौक यैथील लोकसभा क्षेत्राचे खासदार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हर्षवर्धन यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्रीपद रिक्त असून या पदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत. तसेच या पदासाठी एखाद्या तरुण नेतृत्त्वाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्रातून दोन मंत्र्यांचा राजीनामा


महाराष्ट्राच्या कोट्यातून मंत्री प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे या दोघांनीही मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. 


या मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला


सदानंद गौडा, रविशंकर प्रसाद, थावरचंद गहलोत, रमेश पोखरियाल निशंक, डॉ हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर, संतोषकुमार गंगवार, बाबूल सुप्रियो, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया, प्रतापचंद्र सारंगी, देवश्री चौधरी


पाहा व्हिडीओ : केंद्रीय मंत्रिमंडळात विस्ताराआधी दिल्लीत मंत्र्यांचं राजीनामासत्र सुरुच



आज संध्याकाळी 6 वाजता मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार 


 मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. मोदी कॅबिनेटमध्ये देशभरातील अनेक नेत्यांची वर्णी लागणार आहे. असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मोदी सरकार 2.0 मध्ये अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे. 7 जुलै, म्हणजेच आज मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. 


असं असेल मोदींचं मंत्रिमंडळ 


मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून महिलांचे प्रतिनिधित्व वाढविले जात आहे. प्रोफेशनल, मॅनेजमेंट, एमबीए, पदव्युत्तर युवा नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. मोठ्या राज्यांना अधिक वाटा देण्यात येईल. बुंदेलखंड, पूर्वांचल, मराठवाडा, कोकण या भागांना वाटा देण्यात येईल अशी चर्चा आहे.


मंत्रिमंडळात लहान समुदायांना देखील प्रतिनिधित्व दिले जात आहे. यावेळी यादव, कुर्मी, जाट, पासी, कोरी, लोधी इत्यादी समाजाचे प्रतिनिधित्व दिसेल. या विस्तारानंतर दोन डझन ओबीसी किंवा मागासवर्गीय मंत्री यावेळी मंत्रिमंडळात दिसतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :