PM Modi Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; महिनाअखेर कधीही विस्ताराची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार बिहारमधील दोन पक्ष जेडीयू आणि एलजेपीला पुढील मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. असे मानले जाते की मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी पशुपती आणि चिराग पासवान यांच्यातील अंतर वाढले आणि पक्षात फुटण्याची परिस्थिती ओढावली.
PM Modi Cabinet Expansion: लोक जनशक्ती पक्षाची अतंर्गत लढाई आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली आहे. चिराग पासवान आणि पशुपती पारस आपापल्या पद्धतीने पक्षावर आपला अधिकार गाजवत आहेत. दरम्यान, पशुपती पारस पाटण्याहून दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. दिल्लीत पोहोचल्यानंतर एबीपी न्यूजशी बोलताना पशुपती पारस यांनी म्हटलं की, चिराग पासवान आता पक्षाचे अध्यक्ष राहिलेले नाहीत. म्हणूनच त्यांना बैठक बोलावण्याचा अधिकार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार लोक जनशक्ती पक्षाच्या अंतर्गत लढाईला आता आगामी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराशी जोडलं जात आहे. सध्या मंत्रिमंडळात प्रवेश होण्याच्या शक्यतेवर पशुपती पारस म्हणतात की, ते पंतप्रधानांना त्याचे विशेषाधिकार आहेत.
प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे. एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एकामागून एक बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार बिहारमधील दोन पक्ष जेडीयू आणि एलजेपीला पुढील मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. असे मानले जाते की मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी पशुपती आणि चिराग पासवान यांच्यातील अंतर वाढले आणि पक्षात फुटण्याची परिस्थिती ओढावली. इतकेच नव्हे तर बिहारमधील मागील विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने नितीशकुमार आणि चिराग पासवान यांच्यात तणाव वाढला होता, त्यालाही एक कारणही मानले जात आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठ्या हालचाली
लोक जनशक्ती पक्षाच्या अंतर्गत लढाईदरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची हालचाल तीव्र झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मोदी सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधीही केला जाऊ शकतो. सरकारी सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, पहिला विस्तार सर्वसमावेशक होण्याची शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील बऱ्याच जणांना संघटनाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहर्यांचा समावेश असू शकतो. मंत्रिमंडळात प्रादेशिक पक्षांना समाविष्ट करण्याचीही तयारी आहे. या महिन्याच्या शेवटी कधीही मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.