ED :  टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, पॉप्युलर फ्रंट इंडियावरील (PFI) कारवाईनंतर मोठी माहिती समोर येत आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या जुलै 2022 च्या पाटण्यातील रॅलीला लक्ष्य करण्यात आले होते. तसेच यूपीमधील संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी दहशतवादी मॉड्यूलसह इतर हल्ल्यांच्या तयारीत PFI संघटना होती. असा दावा ED कडून करण्यात आला आहे. 


मोदींच्या पाटणा दौऱ्यावर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण शिबिराची स्थापना - ED


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केरळमधून अटक करण्यात आलेल्या पीएफआय सदस्य शफिक पायेथच्या विरोधात रिमांड नोटमध्ये ईडीने खळबळजनक दावा केला आहे. एजन्सीचे म्हणणे आहे की पीएम मोदींच्या पाटणा दौऱ्यावर हल्ला करण्यासाठी पीएफआयने 12 जुलै 2022 रोजी प्रशिक्षण शिबिराची स्थापना केली होती. विशेष म्हणजे 2013 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित दहशतवाद्यांनी त्यांच्या रॅलीमध्ये स्फोटही घडवला होता. असं ED ने म्हटलंय


गुरुवारी मोठी कारवाई
गुरुवारी ईडी आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) सहकार्याने देशातील सुमारे 13 राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले. त्यादरम्यान एनआयएने 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली होती. तर ईडीने चार जणांना ताब्यात घेतले होते. यामध्ये परवेझ अहमद, मोहम्मद इलियास आणि अब्दुल मुकीत यांच्या नावांचा समावेश आहे. मनी लाँड्रिंगच्या तपासादरम्यान ईडीने या सर्वांची यापूर्वीच चौकशी केली आहे.


PFI साठी परदेशातून पैसे पाठवले
या दरम्यान तपास यंत्रणेनेही पायेथच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने भारतातील एनआरआय खाते वापरून त्यांनी पीएफआयसाठी परदेशातून पैसे ट्रान्सफर केले  आहे. रिपोर्टनुसार, ईडीने सांगितले आहे की, गेल्या वर्षी पायेथच्या लपून बसलेल्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. यादरम्यान "पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संस्थांच्या खात्यांमध्ये 120 कोटींहून अधिक रक्कम जमा करण्यात आली, त्यातील मोठा भाग हा देश-विदेशातील संशयास्पद स्त्रोतांकडून रोख स्वरूपात जमा करण्यात आला. असे एजन्सीने म्हटले आहे. ईडीने शुक्रवारी सांगितले की, परदेशात राहणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या काही सदस्यांनी भारतातील ओव्हरसीज इंडियन्स (NRI) खात्यांमध्ये निधी जमा केला आहे. जो निधी नंतर कट्टर इस्लामिक संघटनेकडे हस्तांतरित करण्यात आला. परदेशी निधीशी संबंधित कायदा टाळणे हा त्याचा उद्देश होता.


कट्टर इस्लामिक संघटनेकडे निधी हस्तांतरित?
टाईम्स वृत्तसंस्थेनुसार, ईडीने आरोप केला आहे की पीएफआयने परदेशात निधी गोळा केला आणि इतर माध्यमातून भारतात पाठवला. पीएफआय/सीएफआय आणि इतर संबंधित संघटनांच्या सदस्य, कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांच्या खात्यातूनही निधी पाठवण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. एजन्सीने म्हटले आहे की, परदेशातून मिळालेला निधी सरकारी संस्थांकडून लपवून ठेवण्यात आला होता आणि पीएफआयने असा निधी तसेच देणग्या गोळा करताना नियमांचे पालन केले नाही. कारण ते परदेशी योगदान नियमन कायदा (FCRA) अंतर्गत नोंदणीकृत नाही.


इतर महत्वाच्या बातम्या


Uttarakhand : भाजप नेत्याच्या मुलाला अटक; महिला कर्मचाऱ्याची हत्या, पोलीसांची गाडी अडवून संतप्त महिलांची आरोपींना मारहाण


Todays Headline 24th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या