Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये महाराजा हरिसिंह (Maharaja Hari Singh) यांच्या जयंतीनिमित्त 70 वर्षानंतर शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आल्याने नागरिकांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. महाराजा हरिसिंह यांच्या जयंतीनिमित्त काल म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी फटाक्यांची आतषबाजी झाली. त्यानंतर सकाळी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांनी आपापल्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. कुठे रॅली काढण्यात आली तर कुठे श्रद्धांजली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कुठे मिठाई वाटण्यात आली तर कुठे ढोलाच्या तालावर लोक नाचले. 


127 किलो लाडूंचे लोकांना वाटप
महाराजा हरिसिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा मुख्य कार्यक्रम जम्मूतील तावी पुलाच्या काठावरील महाराजा हरिसिंह यांच्या पुतळ्याजवळ हरिसिंग पार्क येथे पार पडला. या ठिकाणी रॅलीच्या रूपात हजारो लोकांनी येथे जमून महाराजांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी 127 किलो लाडू कापून लोकांना वाटण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना उपस्थित होते. 70 वर्षांनंतर महाराजांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करणे हीच महाराजांना खरी श्रद्धांजली असल्याचे ते म्हणाले. महाराजांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने उत्सव विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी येथील नागरिकांनी या शुभ दिवसाला सामाजिक न्याय दिन असे नाव दिल्याबद्दल डोगरा सभेचे कौतुक करण्यात आले. यानिमित्त सर्व शैक्षणिक संस्था आणि इतर शासकीय विभागांनाही आपापल्या परिसरात 'सामाजिक न्याय दिन' पाळण्यास सांगावे, असे आवाहन सर्वानुमते सरकारला करण्यात आले.


 






 


नागरिकांकडून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचेही आभार
येथील स्थानिक नेत्यांनी जम्मू-काश्मीरमधील नागरिकांचे आणि सर्व सामाजिक लोकांचे अभिनंदन करताना हा ऐतिहासिक प्रसंग दिल्याबद्दल उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचे आभार मानले. धार्मिक, व्यावसायिक आणि राजकीय संघटनांच्या विशेषत: युवा राजपूत सभेच्या उत्साहाला विशेष श्रेय देण्यात आले. रजा मिळाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचेही आभार व्यक्त केले. सरकारच्या या प्रतिकात्मक कृतीतून या महान भारतीय राष्ट्राच्या उभारणीत महाराजांचे योगदान, एक पुरोगामी समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक न्यायाचे समर्थक म्हणून त्यांची भूमिका मान्य करण्यात आली आहे. ते एक आदरणीय राज्यकर्ते होते. 


इतर महत्वाच्या बातम्या


Uttarakhand : भाजप नेत्याच्या मुलाला अटक; महिला कर्मचाऱ्याची हत्या, पोलीसांची गाडी अडवून संतप्त महिलांची आरोपींना मारहाण


Todays Headline 24th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या