Todays Headline 24th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 


आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत तळेगावात  आंदोलन


आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत तळेगाव एमआयडीसीसमोर शिवसेनेचे आंदोलन होणार आहे. फोक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होणार आहे


 आजपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार


 आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केले जातील. सूत्रांच्या माहितीनुसार अशोक गहलोत यांनी अर्ज दाखल केला तरी ते लगेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. दुसरीकडे शशी थरुर 30 तारखेला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.


 आज किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा..संभाजी ब्रिगेडकडून आयोजन


 किल्ले रायगडावर द्वितीय शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होणार आहे. संभाजी ब्रिगेडतर्फे सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय. मंत्री दादा भुसे,  शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले, खासदार डॉ श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहे


अजित पवार बारामती आणि इंदापूरच्या दौऱ्यावर 


अजित पवार बारामती आणि इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी बारामतीत विविध ठिकाणी विकास कामांची पाहणी करतील. तसेच विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार होईल.. तसेच इंदापूर मध्ये अजित पवार मेडिकलचे उद्घाटन करतील.