Hardeep Singh Puri On Fuel Price : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी ( Petroleum Minister Hardeep Singh Puri) यांनी तेल कंपन्यांना इंधनाच्या किमती कमी ( Oil Prices) करण्याचे आवाहन केले आगे. यासोबतच त्यांनी व्हॅट कमी न केल्याबद्दल राज्य सरकारांवरही निशाणा साधलाय. आंतरराष्ट्रीय किमतीत वाढ होऊनही आम्ही तेलाच्या किमतींचा समतोल राखू शकतो. कारण केंद्राने नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये उत्पादन शुल्क कमी केले होते. परंतु, राज्य सरकारांनी व्हॅट कमी केला नाही, असे हरदीप सिंह पुरी म्हणाले.  


केंद्र सरकारने व्हॅट कमी करून देखील काही राज्य सरकारांनी व्हॅट कमी केला नाही. त्यामुळेच व्हॅट न कमी करणाऱ्या राज्यांमध्ये तेलाच्या किमती जास्त आहेत. मी तेल कंपन्यांना विनंती करतो की जर आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती नियंत्रणात असतील आणि त्यांच्या कंपन्यांची अंडर-रिकव्हरी थांबली असेल तर भारतातील तेलाच्या किमती कमी कराव्यात, असे आवाहन पेट्रोलियम मंत्र्यांनी केले आहे.  


भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन आयात करणारा देश


केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी रविवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथी एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन आयात करणारा देश आहे. भारत देशांतर्गत तेल आणि वायूच्या शोधाचा पाठपुरावा करत आहे. शिवाय त्याच्या आयात बेसमध्ये विविधता आणत आहे. याबरोबरच भारत पर्यायी ऊर्जा स्त्रोतांकडे वळत असून ऊर्जा सुरक्षिततेचा मार्ग म्हणून गॅस आणि ग्रीन हायड्रोजनचा वापर करत आहे. 


"वाराणसीतील गंगेच्या काठावर ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करण्याच्या धोरणानुसार आता पर्यावरणपूरक सीएनजीवर बोटी धावू लागल्या आहेत. आतापर्यंत 583 बोटींचे सीएनजीवर चालणाऱ्या बोटीत रूपांतर करण्यात आले आहे. नमो घाट येथे गेलने उभारलेल्या देशातील पहिल्या तरंगत्या सीएनजी स्टेशनवरून या बोटींना सीएनजी पुरवठा केला जात आहे, अशी माहिती मंत्री हरदीप सिंह यांनी दिली. 


Petrol-Diesel Price Today : देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचे दर काय? 


दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 


मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर


कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 


चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 


महत्वाच्या बातम्या


Fuel Subsidy on Indian Oil: इंडियन ऑइलकडून ग्राहकांना 6000 रुपयांचे अनुदान? जाणून घ्या या योजनेबद्दल