एक्स्प्लोर
Advertisement
सरकारची तेल कंपन्यांसोबत बैठक, दिलासा मिळणार?
चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तेल कंपन्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व तेल कंपन्यांचे चेअरमन उपस्थित असतील.
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांचा केंद्र सरकारने धसका घेतला आहे. चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तेल कंपन्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व तेल कंपन्यांचे चेअरमन उपस्थित असतील.
ग्राहकांना तातडीने दिलासा देण्यासाठीच्या पर्यायांवर या बैठकीत चर्चा होईल. नवी दिल्लीत आज सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या आसपास ही बैठक होणार आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेतं आणि ग्राहकांना आजच दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पेट्रोल, डिझेल महाराष्ट्रात सर्वाधिक महाग
मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत. तर दिल्लीत पेट्रोल 76.87 रुपये तर डिझेल 68 रुपये प्रति लिटर झालं आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोल आज 76.87 रुपये प्रति लिटर आहे, जो दर सर्वात महाग आहे. यापूर्वी सप्टेंबर 2013 मध्ये पेट्रोल 76.06 रुपये प्रति लिटर होतं.
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल महाराष्ट्रात आहे. सोलापूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 85.40 रुपये आहे. तर औरंगाबादमध्येही 85.36 रुपये प्रति लिटर दर आहे.
संबंधित बातम्या :
... तर पेट्रोल 53 रुपये आणि डिझेल 41 रुपये लिटरने मिळेल
पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement