Petrol Price Today, Diesel Rate Latest Updates 21th August, 2021 : सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात कोणताही बदल केलेला नाही. आज शनिवार, 21 ऑगस्ट रोजी देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, गेले सगल तीन दिवस डिझेलच्या दरांत सरकारी तेल कंपन्यांकडून घट करण्यात आली होती. तसेच पेट्रोलचे दर सलग एका महिन्यापासून स्थिर आहेत. शुक्रवारी डिझेलच्या दरांत 20 पैशांची घट करण्यात आली होती. सलग तीन दिवसांची घट झाल्यानंतर डिझेल जवळपास 60 पैशांनी स्वस्त झालं आहे. पेट्रोलचे दर मात्र गेल्या 35 दिवसांपासून स्थिर आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, मुंबईत आज पेट्रोलची किंमत 107.83 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे, तर डिझेलची किंमत 96.84 रुपये प्रति लिटर इतकी आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर, जगातील सर्वात मोठा कच्चा तेलाचा ग्राहक, अमेरिकेत (USA) कच्च्या तेलाची मागणी अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. असं बोललं जात आहे की, तेथील केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने कोविड-19 ला दिलं जाणारं स्टिम्युलस पॅकेज संपवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे गुरुवारीही कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली.

पेट्रोलच्या दरांमध्ये मे महिन्यापासून 41 वेळा वाढ झाली 

पेट्रोलच्या दरांत चार मेनंतर 41 वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली, तर तीन वेळा दरांमध्ये घट करण्यात आली. सलग तेलांच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरनं महाग झालं आहे. डिझेल राजस्थान, ओदिशा आणि मध्यप्रदेशातील काही शहरांमध्ये 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. 

देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

जुलै महिन्यातील वाढ

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :

शहरं पेट्रोलची किंमत  डिझेलची किंमत 
दिल्ली  101.84 89.27
मुंबई  107.83 96.84
चेन्नई  102.49 93.84
कोलकाता  102.08 92.32
बंगळुरु  105.25  94.65
भोपाळ  110.20  98.05
चंदीगड  97.93  88.93
रांची 96.68 94.22
लखनौ  104.25  89.61

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).