Petrol-Diesel Price Today 1 May 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी नवे इंधन दर (Fuel Rate) जारी केले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर आहेत. त्यामुळे जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. इंधनाचे दर सलग 26 व्या दिवशी स्थिर आहेत. याआधी 6 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली होती. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रतिलिटर तर मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये प्रतिलिटर आहे. तर डिझेलचा दर दिल्लीत 96.67 रुपये प्रतिलिटर आणि मुंबईत 104.77 रुपये प्रतिलिटर आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल 120.51 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 104.77 रुपये प्रतिलिटर दराने विकलं जात आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 115.12 रुपये आहे. तर डिझेलचा दर 99.83 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये तर डिझेल 100.94 रुपये प्रतिलिटर आहे.
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर
शहर | पेट्रोलची किंमत (प्रति लिटर) | डिझेलची किंमत (प्रति लिटर) |
मुंबई | 120.51 | 104.77 |
दिल्ली | 105.41 | 96.67 |
चेन्नई | 110.85 | 100.94 |
कोलकाता | 115.12 | 99.83 |
हैद्राबाद | 119.49 | 105.49 |
कोलकाता | 115.12 | 96.83 |
बंगळुरू | 111.09 | 94.79 |
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
- इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
- इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
- पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या बातम्या :
- PM Modi : पंतप्रधान मोदी 2 मेपासून विदेश दौऱ्यावर, तीन देशांना देणार भेट, 25 कार्यक्रमांमध्ये सहभाग
- SECR Recruitment 2022 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, येथे करा अर्ज, वाचा सविस्तर
- TATA Group : आता टाटा बनवणार चिप, सेमीकंडक्टर व्यवसायात पदार्पण करण्याची तयारी
- Shubman Gill : शुभमन गिलची एलॉन मस्ककडे स्विगी विकत घेण्याची विनंती, जाणून घ्या काय आहे कारण?