Petrol, diesel : राजधानी दिल्लीमध्ये गाडी चालवणाऱ्यांना वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राशिवाय (पोल्युशन टेस्ट सर्टिफिकेट-पीयूसी) पेट्रोल आणि डिझेल भरता येणार नाही. कारण पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी शनिवारी याबाबत स्पष्ट केले. ते म्हणाले की, 25 अक्टूबरपासून दिल्लीतील ईंधन पंप्मावर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र अनिवार्य होणार आहे.
वाहानांमुळे होणाऱ्या प्रदुर्षणाला आळा घालण्यासाठी दिल्ली परिवाहन विभागाने (Delhi Transport Department) पीयूसीशिवाय वाहन चालवणाऱ्याविरोधात कारवाई सुरु केली आहे. त्यासोबतच आता पेट्रोल पंप्मावरही पीयूसी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. सोमवारी दिल्लीतील केजरीवाल सरकारचं परिपत्रक जारी होण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील केजरीवाल सरकार पेट्रोल पंप्मावर एन्फोर्समेंट ड्राइव्ह सुरु करणार आहे.यामध्ये वैध पीयूसी सर्टिफिकेटशिवाय गाडी चालवणाऱ्याचं लायसन्स सस्पेंड केलं जाईल. त्याशिवाय त्या व्यक्तीकडून दंडही वसूल केला जाणार आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, 25 ऑक्टोबरपासून तुमच्याकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर पेट्रोल पंप्मावर पेट्रोल-डिझेल भरता येणार नाही. वाहनांच्या उत्सर्जनाचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत. इतकेच नाही तर हिवाळ्यातील कृती आराखड्यातही. हिवाळ्यात प्रदुर्षणाचा स्तर वाढतो...त्यामुळे अनेकांना त्रास होतो. त्यामुळे ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वैध पीयूसी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वैध पीयूसी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले.
राजधानी दिल्लीतील परिवाहन विभाग याबाबत सोमवारी परिपत्रक काढणार आहे. केजरीवाल सरकारने पीयूसी प्रमाणपत्रासाठी 25 ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे. त्यानंतर वैध प्रमाणपत्राशिवाय दिल्लीत पेट्रोल भरता येणार नाही. दिल्ली सरकार याची तयारी सुरु केली आहे, लवकरच याबाबतची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी पेट्रोल पंप्माने याला विरोध दर्शवला आहे. कारण, पेट्रोल पंप्मावर यामुळे लांबच लांब रागा लागू शकतात, असे पंप्म मालकांचे मत आहे.
आणखी वाचा :
Mumbai University : मुंबई विद्यापीठाची जागा शिंदे गटाच्या दसरा मेळावा पार्किंगसाठी, विद्यार्थी संघटनांचा जोरदार विरोध
उद्धव ठाकरे यांना 1996 सालीच मुख्यमंत्री व्हायचं होतं, बाळासाहेबांचीही भेट घेतली; सुरेश नवले यांचा गौप्यस्फोट