आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारे वाढ केलेली नाही. आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. 7, 8 आणि 9 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. पण, गेल्या 16 दिवसांत एकूण 10 रुपयांची वाढ झाली.
 
देशातील महानगरांत दर काय? 
शहरं  पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 120.51 104.77 
दिल्ली 105.41  96.67
  
चेन्नई 110.85 100.94 
कोलकाता  115.12 99.83
हैद्राबाद 119.49  105.49 
कोलकाता 115.12  96.83
बंगळुरू  111.09  94.79 

घरबसल्या  जाणून घेऊ शकता पेट्रोल आणि डिझेलचे दर 
तुम्ही घरबसल्या  पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहू शकता. तुम्हाला SMS द्वारे दरांची माहिती मिळू शकते.  एचपीसीएल (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> असा मेसेज पाठवून आजचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक  9224992249  या क्रमांकावर RSP<डीलर कोड> लिहून आणि बीपीसीएल (BPCL) ग्राहक  9223112222  या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवून आजचे नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

महत्त्वाच्या बातम्या :