Petrol-Diesel Price Today 8th June 2022 : भारतीय तेल कंपन्यांच्या वतीनं पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर (Petrol Diesel Rate) आहेत. कंपन्यांनी सलग एकोणवीसाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. 


यापूर्वी 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये घट करत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला होता. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील 8 रुपये आणि डिझेलवरील 6 रुपयांचं उत्पादन शुल्क हटवलं होतं. त्यानंतर देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं होतं. 


सर्वात स्वस्त, सर्वात महाग पेट्रोल-डिझेल मिळतंय कुठे? 


देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 प्रति लिटर आहे. तर, आजही देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 114.38 रुपये प्रति लिटर आणि आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये 100.30 रुपये प्रति लिटर आहे. 


महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय? 


महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.


देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचा दर काय? 


देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).