Sonia Gandhi ED Summons : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावलं आहे. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या आज ईडी चौकशीला गैरहजर राहणार आहेत. काँग्रेसने ईडीकडे चौकशीसाठी तारीख वाढवून देण्याची मागणी केली आहे. 


काँग्रेसचे मीडिया प्रभारी रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी 1 जून रोजी मोदी सरकारवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप केला. त्यांनी आरोप करत म्हटलं की, सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ईडीने नोटीस बजावली आहे. सोनिया गांधी यांनी 8 जून रोजी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप बिनबुडाचे असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.


सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण


सोनिया गांधी यांना 03 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला नाही. 


नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी 13 जून रोजी ईडीसमोर हजर होणार आहेत. राहुल गांधी यांना 2 जून रोजी चौकशीसाठी समन्स बजाण्यात आलं होतं. पण परदेशात असल्याने राहुल गांधी यांनी पुढची तारीख मागितली होती. ईडी सोनिया गांधी यांना चौकशीसाठी पुढील कोणती तारीख देतं हे पाहावे लागेल.


काय आहे प्रकरण?
नॅशनल हेराल्ड' हे वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरु केलं होतं. हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं. मात्र, 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांच्या 'यंग इंडिया' या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र, हे सुरु करण्यात आलं नव्हतं. हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरु आहे.


संबंधित बातम्या



बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.