एक्स्प्लोर
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर आता दररोज बदलणार!

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल खरेदीबाबत तेल कंपन्यांनी मोठी घोषणा केली आहे. देशात 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर आता दररोज बदलणार आहेत. तीन सरकारी तेल कंपन्यांनी या आपल्या जुन्या मागणीवर शिक्कामोर्तब केलं आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या महत्वांच्या कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाच्या व्यवहारात जास्त पारदर्शकता यावी, दरातील चढ-उताराचा ग्राहाकांना फटका बसू नये, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचं ऑईल कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. दररोज बदलणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएस द्वारे सर्वांना कळवण्याचा पेट्रोल कंपन्यांचा विचार आहे. 1 मे पासून उदयपूर, जमशेदपूर, पद्दुचेरी, चंदीगढ आणि विशाखापट्टणम या पाच शहरांत ऑईल कंपन्यांकडून दररोज किंमती बदलण्याचा प्रयोग सुरू आहे, ज्याची आता देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर दररोज ठरवण्याची व्यवस्था अगोदरपासूनच सुरु आहे. ग्राहकांना नियमित दर समजावे, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दररोज वृत्तपत्रांमध्ये दर प्रकाशित केल जातील. मोबाईल अॅप, मेसेजेसद्वारे आणि पेट्रोल पंपांवर प्रभावीपणे दर प्रदर्शित केले जातील, असं तेल कंपन्यांनी सांगितलं आहे.
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















