मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाताना दिसत नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवे विक्रम मोडत आहेत. आज देशात सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. नवी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 30 पैशांची वाढ झाली आहे, तर इतर शहरांमध्ये किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक शहरांत पेट्रोल 90 रुपयांच्या पुढे गेले आहे. मुंबईत तर पेट्रोल 94 रुपयांवर पोहोचले आहे. दरवाढ अशीच सुरु राहिली तर मुंबईत लवकरच पेट्रोलच्या किंमती शंभरी गाठू शकतात.


यावर्षी आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, जागतिक तेलाच्या बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 60 डॉलरच्या पुढे गेली आहे, जी वर्षभरातील सर्वाधिक आहे.


इंधन कसे महाग होते?


परदेशी बाजारातून कच्चे तेल अत्यंत स्वस्त किंमतीत मिळते. पेट्रोल पंपावर येता येता ते महाग होतं. त्यात कोणते कर जोडले जातात? भारत पेट्रोलियम पदार्थ आपल्या गरजेजनुसार आयात करतो म्हणजे दुसर्‍या देशातून खरेदी करतो. तेल आयात केल्यानंतर ते रिफायनरीला पाठवले जाते. येथे या कच्च्या तेलामधून पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थ काढले जातात. रिफायनरीमधून हे तेल पेट्रोल आणि डिझेल विकणार्‍या कंपन्यांना जाते. जसे इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम. या कंपन्या त्यांचा नफा काढून घेतात. या कंपन्या पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल पंपावर वाहतूक करतात, त्यानंतर पेट्रोल पंप मालक देखईल विकताना कमिशन घेतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 2 प्रकारचे कर देखील जोडले जातात. केंद्र सरकारची उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारांचं व्हॅट. व्हॅट म्हणजेच मूल्यवर्धित कर दर जो प्रत्येक राज्यात वेगळा असतो. हे सर्व जोडल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत तीनपट महाग होते.


देशभरातील शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर


दिल्ली
पेट्रोल 87.85 रुपये, डिझेल 78.03 रुपये


मुंबई
पेट्रोल 94.36 रुपये, डिझेल 84.94 रुपये


कोलकाता


पेट्रोल 89.16 रुपये, डिझेल 81.61 रुपये
चेन्नई
पेट्रोल 90.18 रुपये, डिझेल 83.18 रुपये


लखनौ
पेट्रोल 86.77 रुपये, डिझेल 78.39 रुपये


चंदीगड
पेट्रोल 84.55 रुपये, डिझेल 77.74 रुपये


बंगळुरू
पेट्रोल 90.78 रुपये डिझेल 82.72


नोएडा
पेट्रोल86.83 रुपये, डिझेल 78.45 रुपये


पटना
पेट्रोल 90.27 रुपये. डिझेल 83.22 रुपये