नवी दिल्ली :  गेल्या महिन्यात सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये पुन्हा घट दिसून आली आहे. तेल कंपन्याकडून पेट्रोलच्या दरात 22 पैशांनी तर डिझेलच्या दरात 23 पैशांनी घट झाली आहे. दरात घट झाल्यानंतर आता  मुंबईत आज पेट्रोलची किंमत 96.98 रुपये इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 87.96 रुपये इतकी आहे.  दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे 90.56 आणि 80.87  रुपये इतका आहे. 


देशात फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढताना दिसत होत्या. त्यामुळे सामान्य लोकांना महागाईला तोंड द्यावं लागत होतं. आता त्यावर काही अंशी दिलासा मिळाला आहे. 



देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर


मुंबई
पेट्रोल- 96.56 रुपये/लिटर
डिझेल- 80.87 रुपये/लिटर



दिल्ली 
पेट्रोल- 90.56 रुपये/लिटर
डिझेल- 80.87 रुपये/लिटर


कोलकाता
पेट्रोल- 90.77 रुपये/लिटर
डिझेल- 83.75 रुपये/लिटर


चेन्नई
पेट्रोल- 92.58 रुपये/लिटर
डिझेल- 85.88 रुपये/लिटर


देशात 15 जून  2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात. 



पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर तीन सोप्या पद्धतीने पाहता येतील.



तुम्ही तुमच्या जिल्हाचं, तालुक्याचं लोकेशन सिलेक्ट करुन किंवा पेट्रोल पंपाचं नानाव https://associates.indianoil.co.in/PumpLocator/  या लिंकवर टाकून इंधनाचे दर काय आहेत याची माहिती घेऊ शकता.



पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)



इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.