जम्मू काश्मिर :  जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना पासपोर्ट देण्यास  पासपोर्ट कार्यालयाने विरोध दर्शविला आहे. भारताच्या सुरक्षेसाठी हानिकारक असल्यामुळे मला पासपोर्ट असे सांगत मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.


मेहबुबा मुफ्ती ट्वीट करत म्हणाल्या, पासपोर्ट ऑफिसने सीआयईडी रिपोर्टच्या आधारावर मला पासपोर्ट नाकारला आहे. सीआयईडी रिपोर्टमध्ये भारताच्या सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचे लिहिले आहे. काश्मिरमध्ये ऑग्स्ट 2019 पासून ही सामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे की,  जिथे पासपोर्ट असलेली माजी मुख्यमंत्री या पराक्रमी राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला धोका आहे.”






 


मेहबुबा मुफ्ती यांनी 31 मे ला अर्ज केला होता. परंतु पोलिस पडताळणीचा अहवाल नसल्यामुळे हा अहवाल आजपर्यंत मंजूर झाला नाही. 


मोदी सरकारने काश्मिरमध्ये कलम 370 हटवला त्यावेळी ज्या काश्मिरी नेत्यांना नजर कैदेत ठेवले होते त्यापैकी मेहबुबा मुफ्ती या एक होत्या. गेल्यावर्षीच त्यांची सुटका करण्यात आली.