Petrol Diesel Price Today 5 July : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवढीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसतो आहे. आज पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 35 पैसे प्रति लिटरनं वाढ केली आहे. देशाच्या राजधानीत पेट्रोलची किंमत 35 पैसे प्रति लिटरनं वाढून 99.86 वर पोहोचली आहे. तर आज डिझेल किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळ राजधानी दिल्लीत डिझेलची किंमत 89.36 रुपये एवढी आहे.

   


देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही पेट्रोलचे दर नव्याने वाढले आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत पेट्रोल शंभरीपार पोहोचलं असून 105.93 रुपये प्रति लिटर रुपयांनं विकलं जातंय. तर चेन्नईमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. आज  चेन्नईत पेट्रोल 100.79 रुपये प्रति लिटर एवढी झाली आहे. पेट्रोलची किंमत दिल्ली आणि कोलकातामध्येही शतक गाठण्याची शक्यता आहे. कोलकातामध्ये आज पेट्रोल 99.80 प्रति लिटर झालं आहे. दरम्यान मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये डिझेलची अनुक्रमे : 96.91 रुपये, 93.91 रुपये आणि 92.27 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे.


नव्या वाढीसह पेट्रोलची किंमत संपूर्ण देशात विक्रमी दर गाठण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगाणा, आंध्रे प्रदेशातील काही शहरं आणि खेड्यांमध्ये पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठली आहे. तर काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरी पार पोहोचले आहेत.


कच्च्या तेलाची किंमत कमी पण तरीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ


जागतिक पातळीवर, कच्च्या तेलाची किंमत आता प्रति बॅरल 75 डॉलर इतकी आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये हे प्रति बॅरल 80 डॉलरपेक्षा जास्त होती, पण तरीही देशभरात पेट्रोलचे दर 80 रुपये प्रतिलिटर होते. म्हणून, आता तेलाचे कमी दर असूनही, देशाच्या बर्‍याच भागात पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. आता या दोनांघाच्या किंतीतील फरकही जास्त आहे.


या कालावधीत किरकोळ किंमती खाली आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्र आणि राज्ये दोन्ही कर कमी करणे. जाणकारांच्या मते कच्च्या तेलाचे दरात मूळ वाढ इथून होते आहे. इंधनाचे दर प्रत्येक नवीन दिवशी एक नव्या उंचीला स्पर्श करीत आहेत.


पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल


 इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.  


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील. 


 पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).