नवी दिल्ली : अमेरिकेच्या 245 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार 4 जुलै) अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि तेथील जनतेचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले की भारत आणि अमेरिका स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याची मूल्य जपणारे आहेत. दोन्ही देशांच्या सामरिक भागीदारीला खरोखर जागतिक महत्त्व आहे. अमेरिकेत 4 जुलै रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.


मोदी यांच्याकडून ट्विट
पंतप्रधान मोदींनी ट्विट केले, "जो बायडेन आणि अमेरिकेच्या नागरिकांना 245 व्या स्वातंत्र्य दिनी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. जीवंत लोकशाही म्हणून भारत आणि अमेरिका स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याची मूल्ये सामायिक करतात. दोन्ही देशांच्या सामरिक भागीदारीला खरोखर जागतिक महत्त्व आहे.




4 जुलै 1776 रोजी अमेरिका स्वतंत्र
4 जुलै 1776 रोजी अमेरिका देश स्वतंत्र झाला. तेव्हापासून अमेरिकेने जगात आपली एक वेगळी ओळख बनविली आहे. गेल्या काही दशकांत भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधात बरीच सुधारणा झाली आहे. सातत्याने, दोन्ही देशांमध्ये सुसंवाद वाढत आहे. गेल्या वर्षी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौरा केला होता. आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन झाले आहेत. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष आहेत.