IOCL, Petrol-Diesel Price Today 17 March 2022 : रशिया-युक्रेन (Russia Ukraine war) यांच्यातील युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाही. दोन देशांतील तणावानं जगाची धाकधूक वाढवली आहे. जगभरातील अनेक देशांना महागाईचा सामना करावा लागत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतही सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच देशातील तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जारी केले आहेत. आज म्हणजेच, 17 मार्च 2022 रोजी देशात पेट्रोल (Petrol Price) -डिझेलच्या (Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

तब्बल चार महिन्यांपासून देशात इंधन दर स्थिर 

गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे (5 State Assembly Election) दरात वाढ झाली नसल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, देशात निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Rate) विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटून गेल्यानंतरही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. 

रशियावरील निर्बंधाचा भारताला फायदा

देशात तेल आयातीतील एकूण 2 ते 4 टक्के तेल रशियातून आयात होणार असल्याचं म्हटलं जातं. भारत तेल खरेदी करताना व्यवहार रुबल-रुपयामध्ये करण्याची दाट शक्यता आहे. रुबल डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात खाली घसरला आहे. भारताला या तेल खरेदीतून मोठा फायदा होणार आहे.  परदेशी चलन वाचणार असून सोबतच बाजार भावापेक्षा 27 ते 30 टक्के सवलतीच्या दरात तेल खरेदी करता येणार आहे. 

पेट्रोलियम मंत्र्यांनी काय म्हटलं?

पेट्रोलियन मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले की, रशियानं भारताला स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. भारताकडून या प्रस्तावावर विचार करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

इंधन दर दिलासा मिळणार?

भारतात नोव्हेंबर महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर उच्चांकी पातळीवर पोहचलं होतं. त्यामुळे इंधन दर वाढवणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. आता, रशियाकडून कच्च्या तेलाचा पुरवठा होणार असल्याने इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. 

देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय? 

देशातील महानगरं पेट्रोलची किंमत (प्रति लिटर) डिझेलची किंमत (प्रति लिटर)
मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
दिल्ली 95.41 रुपये  
चेन्नई 101.40 रुपये 91.43 रुपये
कोलकाता 104.67 रुपये 89.79 रुपये

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha