Petrol Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी 15 जून रोजी राष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मात्र, आजही इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. यापूर्वी 21 मे रोजी इंधनाचे दर बदलले होते, तेव्हापासून तेलाच्या किमती स्थिर आहेत. दुसरीकडे, जर आपण महाराष्ट्रातील आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) बद्दल बोललो तर, येथे देखील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घेऊया आज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत काय बदल झाले आहेत?


15 जून रोजी मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर किती?


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, आजही मुंबई शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच इंधनाचे दर स्थिर आहेत. मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर पुढीलप्रमाणे आहेत.


मुंबईत 1 लिटर पेट्रोलची किंमत - 111.35 रुपये
मुंबईत 1 लिटर डिझेलची किंमत - रु. 97.28


तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत पाहू शकता
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 92249992249 या क्रमांकावर पाठवू शकता आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).