Petrol-Diesel Price Today 12th October 2022 : कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये विक्रमी घट झाल्यानंतर पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं पाहायला मिळाली. मात्र, आता पुन्हा कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतींत विक्रमी घसरण झाल्यानंतर ओपेक देशांनी (OPEC) उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर पुन्हा एकदा क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा घसरण सुरू आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून इंधन दर स्थिर 

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price)  बऱ्याच दिवसांपासून स्थिर आहेत. सुमारे साडेचार महिन्यांपूर्वीपासून पेट्रोलचे दर स्थिर आहेत. क्रूडच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार होऊनही पेट्रोलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 22 मे 2022 रोजी मोदी सरकारनं तेलाच्या किंमतीवरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं. त्यावेळी देशभरात पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल पाच रुपयांनी स्वस्त झालं होतं.

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांत कपात

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये तेलाच्या किमतींत बदल झाला होता. अलिकडेच तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांत कपात केली आहे. मंगळवारी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 88.64 डॉलरपर्यंत घसरली आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 93.75 डॉलरच्या पातळीवर दिसलं आहे.

राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर 

देशातील महानगरांतील किमती काय? 

शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
चेन्नई 102.74 रुपये 94.33 रुपये
कोलकाता 106.03 रुपये

92.76 रुपये

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).