Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या दरांनी आतापर्यंतचे सर्वच विक्रम मोडले आहे. देशातील जवळपास 135 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्याही पलीकडे पोहोचले आहेत. फक्त यंदाच्याच वर्षीचं सांगावं तर, पेट्रोलच्या दरांत आतापर्यंत जवळपास 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, आजच्या दिवशी पेट्रोल 26- 31 पैसे प्रतीलीटरच्या दरानं महाग झालं आहे. डिझेलचे दर 26-28 पैसे प्रती लीटर या दरानं महागलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रती बॅरलमागे 72 डॉलरच्याही पलीकडे पोहोचले आहेत. ज्यामुळं येत्या काळातही नागरिकांना इंधन दरवाढीची झळ बसण्याची दाट शक्यता आहे. 


जून महिन्यात चौथ्यांदा वाढले दर 
मुंबईत सध्या पेट्रोलचे जर 101 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, डिझेलचे दर 94 रुपयांवर पोहोचले आहेत. जून महिन्यात या दरवाढीबाबत सांगावं तर, चौथ्यांदा ही इंधन दरवाढ झाली आहे. यापूर्वी मार्च महिन्यात जवळपास 16 वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. तर, मे महिन्यात सवग 4 दिवस इंधनाची दरवाढ झाली होती. देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या धर्तीवर 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात होते. पण, निवडणुकांचा काळ लोटल्यानंतर मात्र ही गणितं बेरजेत रुपांतरित होत इंधनाचे दर गगनाला भिडू लागले. 


मुख्यमंत्र्यांचा कोर्लई येथील घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी; किरीट सोमय्या यांचा आरोप


4 मेट्रो शहरांतील पेट्रोलचे दर 
दिल्ली            95.03            95.31          
मुंबई            101.25           101.52
कोलकाता      95.02            95.28
चेन्नई             96.47            96.71


4 मेट्रो शहरांतील डिझेलचे दर  
शहर          कल का रेट     आज का  रेट    
दिल्ली            85.95           86.22
मुंबई             93.30            93.58
कोलकाता     88.80            89.07
चेन्नई             90.66            90.92



पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx   पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).