Petrol-Diesel Price Today 07 August 2022 : तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यांत पेट्रोल (Petrol) -डिझेलचे दर (Diesel Price) गेल्या 72 दिवसांपासून स्थिर आहेत. यापूर्वी सर्वात शेवटी मोदी सरकारनं 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं होतं. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राजस्थान, झारखंड आणि महाराष्ट्रातही राज्य सरकारनं व्हॅट कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.  

यापूर्वी केंद्र सरकारनं 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कापत केली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे. तर राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं 14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर पेट्रोलच्या किमती  डिझेलच्या किमती
मुंबई 106.25 94.22
पुणे  105 92
नागपूर  106.03 92.58
नाशिक 106.74 93.23
हिंगोली 107.29 93.80
परभणी 108.92 95.30
धुळे  106.05 92.58 
नांदेड  108.24 94.71
रायगड  105.96 92.47
अकोला  106.05 92.55
वर्धा  106.56 93.10
नंदुरबार  106.99 93.45
वाशिम 106. 37 93.37
चंद्रपूर 106.14 92.70
सांगली  105.96 92.54
जालना 107.76  94.22

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).