Petrol-Diesel Price Today, 22 November 2021 : आंतरराष्ट्रीय बाजारात दररोज कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किमतींमध्ये घट पाहायला मिळत आहे. तर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol-Diesel) सलग 18व्या दिवशी स्थिर आहेत. या महिन्यात आतापर्यंत सरकारी तल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या (Petrol price today) किमतींमध्ये कोणतीही घट करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel Price today) उत्पादन शुल्कात घट केली होती. त्यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं होतं.
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट सुरुच
Oilprice.com नं दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आज WTI Crude 0.45 टक्क्यांची घट झाली आहे. 75.60 डॉलर प्रति बॅरलनं विकलं जात आहे. याव्यतिरिक्त ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये 0.49 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. त्यानंतर याची किंमत 75.60 डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे.
IOCL नं जारी केले आजचे नवे दर
IOCL च्या अधिकृत वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार, आज पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलची किंमत (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.
केंद्र सरकारनं दिवाळीच्या एक दिवस आधी पेट्रोलवर 5 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींपासून दिलासा दिला होता. दरम्यान, अनेक राज्य अशी होती की, ज्यांनी व्हॅटमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. अशातच मंगळवारी राजस्थान सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 4 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 5 रुपये प्रति लिटरनं स्वस्त करण्यात आलं आहे.
देशातील अनेक शहरांत एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पार
मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लद्दाखमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. मुंबईतील पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).