Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका चोराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. सायकल चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या चोरासोबत घडलेला प्रकार पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओत सायकल चोरी करण्यासाठी आलेल्या चोराची गडबड आणि घरमालकाची धडपड सर्वांनाच पाहायला आवडत आहे. चोराचा हा मजेदार व्हिडिओला आतापर्यंत 14 हजारांहून अधिक वेळा पाहण्यात आलाय. इन्स्टाग्रामवरील एका मीम पेजनं हा व्हिडिओ शेअर केलाय. 

Continues below advertisement


दरम्यान, व्हिडिओत दिसणाऱ्या घर मालकानं त्याच्या घराचा मुख्य गेट बंद केला नव्हता. याचाच गैरफायदा घेऊन एक चोर दिवसाढवळ्या त्याच्या घरात घुसला. तसेच घरात कोणी आहे की नाही? याची खात्री करण्यासाठी तो इकडं-तिकडं पाहू लागला. तसेच घराच्या आवारात एक स्कूटी आणि सायकल उभी असल्याचं दिसत आहे. चोरट्यानं सायकल घेऊन घाईघाईनं घराबाहेर निघून गेला. यादरम्यान घरमालकानं चोराला पाहिलं आणि त्याच्या मागे धावत गेला. पुढे काय घडलंय हे कॅमेऱ्यात कैद झाले असून घरमालकानं चोराला रंगेहाथ पकडल्याचं या व्हिडिओत दिसतंय. 


व्हिडिओ-




 


घर मालक काही वेळानं आपली सायकल घरी परत घेऊन येताना दिसत आहे. या व्हिडिओच्या मध्ये टाकलेली मीम क्लिप आणि  बॅकग्राउंड मध्ये वाजणाऱ्या म्युजिकनं या व्हिडिओला आणखी मजेदार बनवलंय. हा व्हिडिओ पाहून नेटकरी खूप हसत आहेत. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओवर कंमेटचा वर्षाव केला जात आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-