Petrol Diesel Price in 31 October 2022 : आधीच महागाईच्या गर्तेत अडकलेल्या सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती स्थिर असताना, इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी आज नेहमीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. तेल कंपन्यांनी सोमवारी (31 October 2022) पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे देशात सलग 160 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत. सध्या, WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे 87 डॉलर इतकी आहे आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल सुमारे 94 डॉलर इतके आहे. यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.
दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.35 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये आहे. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये, मुंबई 94.28 रुपये, कोलकाता 92.76 रुपये आणि चेन्नईमध्ये 94.24 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे.
इथे मिळतंय देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल
पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. इथे पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारावर सकाळी 6 वाजता दररोज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरांत काही बदल झाल्यास त्यांची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यामुळे, प्रत्येक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखे नसतात.
राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).