मुंबई : भारताच्या इतिहासात 31 ऑक्टोबर ही तारीख देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा दिवस म्हणून नोंद आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची  31 ऑक्टबर 1984 रोजी सकाळी त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली.  इंदिरा गांधी यांनी 1966 ते 1977 या काळात सलग तीन वेळा देशाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर 1980 मध्ये पुन्हा या पदावर पोहोचल्या. पंतप्रदान पदावर असतानाच त्यांची हत्या झाली.  त्यांना आयरन लेडी ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जात असे. इंदिरा गांधी यांचा जन्म 17 नोव्हेंबर, 1917 रोजी अलाहाबाद येथे कश्मिरी पंडित कुटुंबात झाला. त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू हे ब्रिटिश राजवटीत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे व्यक्तिमत्व होते आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान सुद्धा होते. इंदिरा या जवाहरलाल नेहरू यांच्या एकुलत्या एक कन्या रत्न होत्या. 

इंदिरा गांधी यांनी  1930 साली ‘वानर सेना’ नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1955 मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी 1959 मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या 1964 साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्या माहिती व नभोवाणी मंत्री होत्या. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे 1966 मधे मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने 186 मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या 24 जानेवारी, 1966 रोजी पंतप्रधान म्हणून विजयी झाल्या. 14 प्रमुख व्यापारी बॅकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या. 

 1875 : वल्लभभाई पटेल यांचा जन्म

31 ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 147 वी जयंती आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच वल्लभभाई पटेल यांची जयंती देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. 2014 मध्ये प्रथमच राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीही होते.  

 सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नडियाद येथे झाला. लंडनला जाऊन त्यांनी बॅरिस्टरचे शिक्षण घेतले आणि परत येऊन अहमदाबादमध्ये वकिली करू लागले. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.  सरदार पटेल यांचे स्वातंत्र्य चळवळीतील पहिले आणि मोठे योगदान 1918 मध्ये खेडा लढ्यात होते. 1928 च्या बारडोली सत्याग्रहातही त्यांनी शेतकरी चळवळीचे यशस्वी नेतृत्व केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थानांचे एकत्रीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीमध्ये त्यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांनी 562 लहान-मोठ्या संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून भारतीय एकता निर्माण केली.
 
1920 : ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे उद्घाटन सत्र मुंबईत पार पडले

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत भरले होते. लाला लजपत राय या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 

 1941 : दक्षिण डकोटाच्या ब्लॅक हिल्समधील माउंट रेस्मोर नॅशनल म्युझियमचे काम पूर्ण

सुमारे 15 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर दक्षिण डकोटाच्या ब्लॅक हिल्समधील माउंट रेस्मोर नॅशनल म्युझियमचे काम पूर्ण झाले. जिथे जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रुझवेल्ट आणि अब्राहम लिंकन या चार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे चेहरे टेकड्यांवर कोरले गेले. 

 1966 : भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी पनामा कालवा पोहून पार केला 
मिहीर सेन हे एका कॅलेंडर वर्षात पाच वेगवेगळ्या महाद्वीपांमधील सातासमुद्रांत पोहणारे पाहिले भारतीय होते. 16 नोव्हेंबर 1930 या दिवशी पश्चिम बंगालमध्ये ब्रिटिशकालीन भारतातील पुरुलिया या ठिकाणी एका ब्राह्मण परिवारात मिहीर सेन यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव डॉ. रमेश सेनगुप्ता असून आईचे नाव लीलावती होते. त्यांचे वडील एक फिजीशिअन होते. त्यांचं सुरुवातीचं जीवन हालअपेष्टांनी भरलेलं होतं. अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यांना इंग्लंडमध्ये वकिली शिकण्याची तीव्र इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी खूप मेहनतसुद्धा घेतली.  31 ऑक्टोबर 1966 रोजी  मिहिर सेन यांनी पनामा कालवा पोहून पार केला 

1968 : अमेरिकेचे अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी उत्तर व्हिएतनाममध्ये बॉम्बफेक थांबवण्याचे आदेश दिले
व्हिएतनाम युद्धात युनायटेड स्टेट्सची भूमिका दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाली आणि 1955 ते 1973 या व्हिएतनाम युद्धादरम्यान पूर्ण नियोजनपद्धतीने भूमिका पार पाडली. दक्षिण व्हिएतनाममध्ये अमेरिकेचा सहभाग अनेक घटकांच्या संयोगातून उद्भवला.  28 जुलै 1965 ला राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील भाषणात राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांनी दक्षिण व्हिएतनाममध्ये 50,000 अतिरिक्त यूएस सैन्य पाठवण्याचा निर्णय जाहीर केला. तेथील कर्मचार्‍यांची संख्या दोन-तृतीयांशने वाढवली आणि 125,000 आणण्याची घोषणा केली. जॉन्सन यांनी असेही सांगितले की यूएस सशस्त्र दलांमध्ये भरती आणि प्रशिक्षणासाठी मासिक मसुदा कॉल दुप्पट ते 1,000 पेक्षा जास्त नवीन तरुण (17,000 ते 35,000 पर्यंत) दररोज होईल. 1966 ला लिंडन बी. जॉन्सनने व्हिएतनाममध्ये पाठवलेल्या सैन्याची संख्या 385,000 पर्यंत वाढवली. 1968 व्हिएतनाममध्ये अमेरिकेच्या लष्कराची संख्या 536,100 पर्यंत पोहोचली. याच वर्षी 31 ऑक्टोबर रोजी तत्कालीन अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी बॉम्बफेक थांबवण्याचे आदेश दिले दिले. 

 1984 : भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या 

31 ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 147 वी जयंती आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच वल्लभभाई पटेल यांची जयंती देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. 2014 मध्ये प्रथमच राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीही होते.  

 सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नडियाद येथे झाला. लंडनला जाऊन त्यांनी बॅरिस्टरचे शिक्षण घेतले आणि परत येऊन अहमदाबादमध्ये वकिली करू लागले. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.  सरदार पटेल यांचे स्वातंत्र्य चळवळीतील पहिले आणि मोठे योगदान 1918 मध्ये खेडा लढ्यात होते. 1928 च्या बारडोली सत्याग्रहातही त्यांनी शेतकरी चळवळीचे यशस्वी नेतृत्व केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थानांचे एकत्रीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीमध्ये त्यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांनी 562 लहान-मोठ्या संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून भारतीय एकता निर्माण केली.

1992 :  लायबेरियात पाच अमेरिकन नन्सची हत्या  
लायबेरियात पाच अमेरिकन नन्सची हत्या करण्यात आली. चार्ल्स टेलरच्या बंडखोरांना या खुनासठी जबाबदार धरण्यात आलं.   

 2003 : मलेशियातील महाथिर युगाचा अंत
 मलेशिया में महातिर युग का अंत झाला. प्रधानमंत्री महातिर मोहम्मद यांनी 22 वर्षे सत्तेत राहिल्यानंतर 31 ऑक्टोबर 2003 रोजी पंदप्रदान पदाचा राजीनामा दिला. 

 2006 : दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद युगाचे अध्यक्ष पीडब्ल्यू बोथा यांचे निधन 

दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद युगाचे अध्यक्ष पीडब्ल्यू बोथा यांचे वयाच्या 90  व्या वर्षी निधन झाले. ते दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष होते. बोथा 1978 ते 1989 पंतप्रधानपदी तर 1984 ते 1989 दरम्यान राष्ट्राध्यक्षपदी होते.