Morbi Cable Bridge Collapses: गुजरातमधील मोरबीत रविवारी झुलता पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला. या दुर्घटनेत 141जणांचा मृत्यू झालाय तर शंभरहून अधिक जण जखमी  झाले आहेत.  सुमारे चारशेहून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावासाठी एनडीआरएफ आणि गरूड कमांडोंकडून घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.  दरम्यान पाच दिवसापूर्वीच हा पूल दुरुस्त करण्यात आला होता. यामुळे पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 


माच्छू नदीवर बनवण्यात आलेला हा झुलता पाच दिवसांपूर्वीच नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. सध्यांकाळी 7 च्या सुमारास ह दुर्घटना घडली. दुर्घटना घडली त्यावेळी 500 हून अधिक नागरिक उपस्थित होते. सर्व जण छट पूजा (Chhath) साजरी करण्यासाठी आले होते.  यामध्ये महिला आणि लहान मुलांचा सहभाग अधिक होता.  य दुर्घटनेत  400  हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती आता वर्तवलीय जात आहे. तर आतापर्यंत 170 हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे.


वायुसेनेच्या जवानांना बचावकार्यासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच गुजरात सरकारने मदतीसाठी 02822-243300 हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. मोरबी येथील स्थानिक आमदार बृजेश मेरजा म्हणाले, आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे.






 


दुर्घटनेनंतर नौदलाच्या 50 कर्मचाऱ्यांसह NDRF, हवाई दलाच्या जवानांना रेस्क्यू ऑपरेशनकरता पाठवण्यात आले आहे. तसेच राजकोट सिव्हिल रुग्णलयात एक आयसोलेशन वॉर्ड बनवण्यात आला आहे. मोरबी येथील हा झुलता पुल हा महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय सुरू करण्यात आला आहे. पैसे कमवण्याच्या हेतूने हा पूल सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे. या पूलावर जाण्यसाठी नागरिकांना 17 रुपये तर लहान मुलांना 12 रुपये तिकिट आकारण्यात आले आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबाना पीएमएनआरएफ (PMNRF) निधीतून दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरतचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्री निधीतून मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.