Petrol Diesel Price in 17 October 2022 : देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे आणि या काळात लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. अशा स्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरांवर सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आजही, सरकारी तेल विपणन कंपन्या इंडियन ऑईल (IOC), BPCL आणि HPCL यांनी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत आणि त्यात कोणतीही कपात केलेली नाही. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.
कच्च्या तेलाच्या किमती काय?
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये गेल्या 24 तासांत जवळपास 1 टक्क्यांची घट पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) आज बदलल्या आहेत. पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड पुन्हा एकदा 93 डॉलर्सच्या खाली गेलं आहे. आजच्या किमती पाहता, घसरणीनंतर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 92.08 डॉलरवर व्यापार करत आहे. तर WTI क्रूड प्रति बॅरल 85.98 डॉलरवर कायम आहे.
देशातील महानगरांतील किमती काय?
शहरं | पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) | डिझेलच्या किमती (प्रति लिटर) |
मुंबई | 106.31 रुपये | 94.27 रुपये |
दिल्ली | 96.72 रुपये | 89.62 रुपये |
चेन्नई | 102.74 रुपये | 94.33 रुपये |
कोलकाता | 106.03 रुपये |
92.76 रुपये |
राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर
तुमच्या शहरांतील दर कसे तपासाल?
तुम्ही जर बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP <डीलर कोड> लिहा आणि 9223112222 या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.