Petrol Diesel Price in 09 November 2022 : देशातील तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) जाहीर केले आहेत. नव्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणाताही बदल झालेला नाही. महाराष्ट्र आणि मेघालय वगळता कच्च्या तेलात अस्थिरता असूनही बंगाल, राजस्थान, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, यूपीसह सर्व राज्यांमध्ये इंधनाचे दर 172 व्या दिवशी स्थिर आहेत. दरम्यान, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी सलग सात महिने दर बदललेले नाहीत.


कच्च्या तेलाच्या किमतीत आज 2.61 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. ब्रेट क्रूड 95.36 डॉलर प्रति बॅरल आणि WTI 88.77 डॉलर प्रति बॅरल होतं. दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.35 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये आहे. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये, मुंबई 94.28 रुपये, कोलकाता 92.76 रुपये आणि चेन्नईमध्ये 94.24 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. 


सरकारी  तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारावर सकाळी 6 वाजता दररोज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरांत काही बदल झाल्यास त्यांची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यामुळे, प्रत्येक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखे नसतात.


राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?



  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 

  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर 


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).