Earthquake In UP : दिल्ली एनसीआर (Earthquake In UP) ते उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौ, कानपूर, मुरादाबाद, बरेली, आग्रा आणि मेरठसह अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी रात्री भूकंपाचे दोन धक्के जाणवले. पहिल्यांदा रात्री 8.52 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 इतकी असल्याचे समजते. यानंतर मध्यरात्री 1.57 वाजता पुन्हा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता 6.3 इतकी मोजली गेली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र होते. एनसीएसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भूकंपाची खोली जमिनीपासून 10 किमी खाली होती. तर, एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या नेपाळमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. डोटी जिल्ह्यात घर कोसळल्याने या लोकांचा मृत्यू झाला आहे.
नेपाळमध्ये भूकंपाचे केंद्र - नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी
रात्री उशिरा भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली-एनसीआरमध्ये लोकांचा एकच गोंधळ पाहायला मिळाला. 9 नोव्हेंबर रोजी रात्री उत्तर प्रदेशातील अनेक भागात 1.57 च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. राजधानीपासून नोएडा, गुडगाव, गाझियाबाद आणि इतर भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचे केंद्र भारत-नेपाळ सीमेवरील धारचुला भागात जमिनीपासून 10 किमी खाली बसला तर नेपाळच्या कुळखेतीमध्ये भूकंपाचा दुसरा धक्का बसला असल्याचे सांगितले जात आहे.
नेपाळमध्ये आठ जणांचा मृत्यू
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र होते. एनसीएसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भूकंपाची खोली जमिनीपासून 10 किमी खाली होती. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या नेपाळमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. डोटी जिल्ह्यात घर कोसळल्याने या लोकांचा मृत्यू झाला आहे.
दोनदा भूकंपाचे धक्के, लोकं मध्यरात्री घाबरून घराबाहेर पडले
उत्तर प्रदेशातील अनेक भागात मंगळवारी रात्री सुमारे पाच तासांच्या अंतराने दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, जमीन दुसऱ्यांदा जवळपास 20 सेकंद थरथरत होती. मात्र, या भूकंपामुळे कुठलेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भूकंप झालेल्या भागात राहणाऱ्या लोकांच्या घरातील सामान अचानकपणे हलू लागल्यामुळे लोकं मध्यरात्री घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपाचे अनुभव लोक सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
भारतात कुठे कुठे जाणवले भूकंपाचे धक्के?
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि लगतच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, 6.3 तीव्रतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. राजधानीतील अनेक भागात रात्री 1.57 च्या सुमारास या भूकंपाच्या धक्क्यांनी लोक अचानक जागे झाले. दिल्लीशिवाय उत्तराखंड, हिमाचल आणि उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत
1 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात भूकंप
1 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:43 वाजता मध्य प्रदेशातील जबलपूर आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. आयएमडीचे शास्त्रज्ञ वेद प्रकाश यांनी सांगितले की, त्याचा केंद्रबिंदू दिंडोरीजवळ 10 किमी खोलीवर होता.