Petrol Diesel Latest Price : इंधन दरवाढीचं सत्र सुरु असतानाच सलग दुसऱ्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींना ब्रेक लागला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून त्यांच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. देशातील अनेक शहरांत पेट्रोलनं शंभरी केव्हाच ओलांडली असून डिझेल शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 101.19 रुपयांनी विकलं जात आहे. तर डिझेल 89.72 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. तर मुंबईत पेट्रोल 107.20 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.29 प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. 
 
राष्ट्रीय राजधानीत 1 मे रोजी 90.40 रुपये प्रति लिटर पेट्रोलची किंमत होती. तर आता राजधानीत पेट्रोलची किंमत 100.19 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलच्या किंमतीत तब्बल 10.51 रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरातही प्रतिलिटर 9.15 रुपयांची वाढ झाली आहे.
 
शहरं  पेट्रोची किंमत प्रति लिटर  डिझेलची किंमत प्रति लिटर 
दिल्ली 101.19 89.72
मुंबई 107.20 97.29
चेन्नई 101.92 94.24
कोलकाता  101.35 92.81
बंगळुरू 104.58 95.09
भोपाळ  109.53 98.50
चंदीगढ 97.37 89.35
लखनौ 98.29 90.11
पाटना 103.92 95.30
पाटना 103.92 95.30

यापूर्वी सोमवारी इंधनदरात वाढ झाली होती, काय होते दर? 

देशात पेट्रोलच्या किंमतीत सोमवारी वाढ झाली होती. सोमवारी पेट्रोल 28 पैशांनी महाग झालं असून मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 107.20 रुपयांवर गेली होती.  तर डिझेलची किंमत 17 पैशांनी घटून ती 97.29 रुपयांवर पोहोचली होती. दिल्लीमध्ये काल पेट्रोलची किंमत 101.23 रुपयांवर गेली होती तर डिझेलच्या दरात 16 पैशांनी घट झाली असून त्याची किंमत 89.76 रुपये इतकी झाली होती.

देशातील सर्व महानगरातील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत. 

देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

महत्त्वाच्या इतर बातम्या :