मुंबई : सुंदर पिचाई... गुगलसारख्या एवढ्या मोठ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ. एक भारतीय वंशाची व्यक्ती एवढ्या मोठ्या कंपनीच्या सर्वोच्च पदावर असल्याचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे. मात्र परदेशात इतकी वर्ष राहूनही सुंदर पिचाई यांचं भारतासोबतच नातं तेवढंच घट्ट आहे. त्यांनी बीसीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ते दिसून आलं.
बीबीसीने घेतलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की, तुम्ही अमेरिकन आहात की भारतीय? त्यावर सुंदर पिचाई यांनी उत्तर दिलं की, आता मी अमेरिकेचा नागरिक आहे, मात्र भारत माझ्या मनात खोलवर रुतलेला आहे आणि तो कायम आहे. मी आज जो काही आहे, त्यात भारताचा वाटा सर्वात मोठा आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजेन्स क्रांती आणणार
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सांगितलं की, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि क्वांटम कॉ्म्प्युटर येत्या 25 वर्षांत क्रांती घडवून आणेल. आता हे नक्की काय आहे ते जाणून घेऊया. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सबाबत पिचाई म्हणाले, "मी याला मानवनिर्मित सर्वोत्तम तंत्रज्ञान म्हणून मानतो. आता आपण अग्नी, वीज किंवा इंटरनेटबद्दल जे विचार करता, हे देखील तसंच होणार आहे. मला वाटतं कदाचित त्यापेक्षा चांगले असेल. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स प्रणाली मानवांप्रमाणेच काम करण्यासाठी तयार केली जाते. विशेषत: विशिष्ट प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
आयआयटी, खडगपूरमधून घेतली इंजिनीअरिंगची पदवी
सुंदर पिचाई यांची 2015 मध्ये ऑगस्ट महिन्यात गुगलच्या सीईओपदी वर्णी लागली. पिचाई हे टेक वर्ल्डमधील मोठं नावं आहे. सुंदर पिचाई 2004 पासून गूगलमध्ये काम करत आहेत. पिचाई हे गूगलच्या अँड्रॉईड, क्रोम आणि अप्स डिव्हिजनचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट होते. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलपमेंटमध्ये सुंदर पिचाई यांची महत्त्वाची भूमिका होती. पिचाई यांचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनीअर होते, तर सुंदर पिचाई यांना लहानपणापासूनच गॅझेट्सची आवड होती.
सुंदर पिचाई यांचा जन्म चेन्नईमध्ये 1972 मध्ये झाला होता. पिचाई यांना पेन्सिलव्हानिया यूनिव्हर्सिटीमध्ये सायबेल स्कॉलर नावाने ओळखलं जात होतं. पिचाई यांनी त्यांची इंजिनीअरिंगची पदवी आयआयटी, खडगपूरमधून घेतली आहे. ते बॅचमधील सिल्वर मेडलिस्ट होते. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये सुंदर यांनी एमएसचं शिक्षण पूर्ण केलं तर वॉर्टन यूनिव्हर्सिटीमधून एमबीए केलं.
इतर बातम्या
- कोरोना संकटात Google आणि Microsoft भारतासोबत; सुंदर पिचाई, सत्या नडेला यांच्याकडून मदतीचा हात
- गुगल बॉस, मला नोकरी करायची आहे, पिचाईंना चिमुरडीचं पत्र