नवी दिल्ली : कोरोनावर पूर्णत: नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मात्र लसींच्या पुरेशा साठा उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरु झालं की लसीकरण मोहिमेला आणखी वेग येईल. मिळालेल्या माहितीनुसार रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन भारतात लवकरच सुरू होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट सप्टेंबरपासून रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या निर्मितीला सुरुवात करणात आहे.


देशात सध्या सीरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस नागरिकांना दिली जात आहे. तर स्पुटनिक व्ही लस खासगी रुग्णालयात दिली जात आहे. स्पुटनिक व्ही लसीला देशात मंजुरी मिळाल्यानंतर आता भारतात या लसीच्या उत्पादनालाही हिरवा कंदिल मिळाला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सप्टेंबरपासून स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन सुरू करणार आहे.


Corona Update: दिलासा! मागील 24 तासांत देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीहून जास्त


भारतातील इतर काही उत्पादकदेखील स्पुटनिक व्ही लस तयार करण्यास तयार आहेत, असं रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव यांनी सांगितलं. तर एका अहवालानुसार, रशियाच्या स्पुटनिक व्हीने जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी दरवर्षी 300 दशलक्ष डोस तयार करण्याचा करार केला आहे. सध्या, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला रशियामधील गामालेया सेंटरकडून सेल आणि वेक्टरचे नमुने प्राप्त झाले आहेत.


Sputnik V लस घेतल्यानंतर दोन महिने दारुचे सेवन नको, रशिया सरकारचा नागरिकांना सल्ला


देशातील लसीकरणाची सद्यस्थिती 


आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे एकूण 38 कोटी 14 लाख 67 हजार 646 डोस देण्यात आले आहेत. यापैकी 30 कोटी 66 लाख 12 हजार 781 लोकांना कोरोना लसचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 7 कोटी 48 लाख 54 हजार 865 लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.


Zika Virus : देशात घोंघावतंय झिका व्हायरसचं संकट; दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत अलर्ट जारी