Petrol Diesel Price in 26 October 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Prices) गेल्या काही काळापासून चढ उतार होत असल्याचं दिसून येत आहे. आज ब्ल्यूटीआय क्रूड ऑईल और ब्रेंट क्रूड ऑईल दरात घसरण झाली आहे. त्यामुळे आता पाडव्याच्या दिवशी सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळणार की, त्यांच्या खिशाला कात्री लागली आहे, पाहुयात...
दररोज सकाळी 6 वाजता इंडियन ऑईल (Indian Oil) भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) या सरकारी कंपन्या पेट्रोल डिझेलचे दर जारी करतात. आज 26 ऑक्टोबर 2022 रोजी पेट्रोल डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Today) कोणताही बदल झाला नाही. तेलाचे दर जैसे थेच आहेत.
दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या देशातील चार मुख्य शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. उत्तरप्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये जसे की, नोएडा, लखनौ या शहरामध्ये इंधनाच्या दरात किंचित बदल झाला आहे. नोएडामध्ये पेट्रोलच्या दरात 36 पैसे तर डिझेला 32 पैशांची घसरण झाली आहे. त्यानंतर आता पेट्रोलची आता 96.64 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची 89.82 रुपयांनी विक्री होत आहे. तर उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमध्ये पेट्रोलच्या दरात 13 पैसे आणि डिझेलच्या दरात 12 पैश्यांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतर आता लखनौमध्ये पेट्रोल 96.57 आणि डिझेलची 89.76 रुपयांनी विक्री होत आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे.
राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई : पेट्रोल106.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.24रुपये प्रति लिटर
कोलकाता : पेट्रोल 106.02 रुपये, डिझेल 92.67 प्रति लिटर
पेट्रोल-डिझेलचे दर कसे पाहाल?
तुम्ही जर बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP <डीलर कोड> लिहा आणि 9223112222 या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.