एक्स्प्लोर
काश्मीरमध्ये शिक्षणमंत्र्यांच्या घरावर पेट्रोलबॉम्ब हल्ला

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे शिक्षणमंत्री नईम अख्तर यांच्या घरावर पेट्रोलबॉम्ब हल्ला झाला आहे. सोमवारी रात्री अज्ञातांनी त्यांच्या श्रीनगरमधील घरावर हा हल्ला केला. या बॉम्बहल्ल्यावेळी अख्तर घरात उपस्थित नव्हते. त्यामुळे सुदैवाने ते बचावले. या हल्ल्यात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र घराच्या मुख्य प्रवेशदाराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अख्तर आणि त्यांची बायको मार्च महिन्यातच अतिसुरक्षित गुपकार रोडवर राहायला गेले आहेत. दरम्यान, हा हल्ला कोणी आणि का केला याबाबतचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. भारतीय जवानांनी काही दिवसांपूर्वीच हिजबुल मुजाहिद्दीनचा अतिरेकी बुरहान वानीचा खात्मा केला. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात असंतोष उसळला होता. यामध्ये अनेक तरुणांना जीव गमावावा लागला, तर काही लोक पेलेट गनमुळे गंभीर जखमीही झाले होते.
Before You Go
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया






















