मुंबई : पेट्रोल, डिझेलचे दर हळू हळू शंभरीकडे चालले आहेत.  काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल दर 97.57 रुपयांवर पोहोचलं आहे, तर डिझेलचे दर 88.60 रुपये झाले आहे. वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2021 रोजी राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 83 .71 रुपये होती तर डिझेलची किंमत 73.87 रुपये होती. पण आज 27 फेब्रुवारी 2021 रोजी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 91.19 रुपये आणि डिझेलची किंमत 81.47 रुपये आहे.

Petrol Diesel Prices: राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता

महत्वाच्या शहरातील किमती खालीलप्रमाणे
शहर पेट्रोल डिझेल
दिल्ली 91.19 81.47
मुंबई 97.57 88.60
कोलकाता 91.35 84.35
चेन्नई 93.17 86.45
बेंगळुरु 94.22 86.37
पाटणा 93.48 86.73
लखनौ 81.85 81.85
भोपाळ 89.76 89.76
रांची 88.54 86.12

Petrol and Diesel price | पेट्रोल-डिझेलच्या किंंमतीवर काही बोलणं म्हणजे 'धर्मसंकट': केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. बेंचमार्क कच्चे तेल ब्रेंट क्रूड 66 डॉलर प्रती बॅरलच्या वर आहे तर डब्ल्यूटीआयचा दर 63 डॉलरच्या वर आहे.

Petrol-Diesel Prices: पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल? इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर तीन सोप्या पद्धतीने पाहता येतील.

तुम्ही तुमच्या जिल्हाचं, तालुक्याचं लोकेशन सिलेक्ट करुन किंवा पेट्रोल पंपाचं नाव https://associates.indianoil.co.in/PumpLocator/ या लिंकवर टाकून इंधनाचे दर काय आहेत याची माहिती घेऊ शकता. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत) इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

तुम्ही एक लिटर पेट्रोल-डिझेल भरता, तेव्हा सरकारच्या तिजोरीत किती रुपयांची भर पडते?