एक्स्प्लोर

सलग सतराव्या दिवशी इंधनवाढ, दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर समान पातळीवर

आज (23 जून) सलग सतराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर समान पातळीवर पोहोचले आहेत. यावरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारवर निशाणा साधत जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका केली आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे कोरोना संकटातच नागरिकांना महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. इतकंच नाही तर ट्रॅक्टर, ट्रकसह अनेक आवश्यक सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलच्या दरातही ऐतिहासिक वाढ झाली आहे. आज (23 जून) सलग सतराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. पेट्रोलचे दर 20 पैशांनी वधारले आहेत तर डिझेलमध्ये 55 पैशांनी वाढ झाली आहे. यासोबत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 79.76 रुपयांवर पोहोचलं असून डिझेलचा प्रति लिटर दर 79.40 पैसे आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आता फक्त 36 पैशांचाच फरक राहिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर एवढं कमी होण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

मुंबईतील आजचा (23 जून) पेट्रोलचा दर 86.54 रुपये असून डिझेल 77.76 रुपये आहेत. मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर जवळपास नऊ रुपये आहे.

मागील काही वर्षांची तुलना केल्यास, 2012 पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 30 रुपयांचा फरक होता. याआधी पेट्रोल आणि डिझेलमध्ये किंमतीमध्ये अंतर कायम होतं. पण आंतरराष्ट्रीय बाजाराशी इंधनाचे दर जोडल्यानंतर हा फरक संपुष्टात आला. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या करांमध्येही वाढ झाली आहे. डिझेलचा वापर मोठ्या वाहनांची वाहतूक आणि शेतकऱ्यांकडून जास्त केला जातो. हे लक्षात घेऊन यावर कमी कर लावला जातो, जेणेकरुन किंमती कमी राहतील.

ऑक्टोबर 2014 मध्ये इंधनाच्या किंमतीवरील सरकारी नियंत्रण हटलं आणि दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली. दिल्लीबाबत बोलायचं झाल्यास पेट्रोल आणि डिझेलवर लागणारा कर जवळपास समान आहे. पेट्रोलवर 64 टक्के तर डिझेलवर 63 टक्के कर आकारला जात आहे. मात्र आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर नऊ ते दहा रुपये आहे. याचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून डिझेलवर कमी कर आकारला जातो.

दरम्यान, 4 मे रोजी दिल्ली सरकारने डिझेलवरील वॅट 16.75 टक्क्यांनी वाढवून 30 टक्के केला होता. यामुळे डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली होती. मुंबईशी तुलना केल्यास दिल्लीत पेट्रोल स्वस्त आहे पण डिझेल महागलं आहे.

सरकारने इंधन दरवाढ करुन जनतेच्या जखमांवर मीठ चोळलं सलग 17 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून सरकारने निर्दयीपणे जनतेच्या जखमांवर मीठ चोळले आहे, अशी टीका काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. काँग्रेस कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीत त्यांनी सरकरावर निशाणा साधला. त्याआधी भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या जवानांना दोन मिनिटे श्रद्धांजली वाहून काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली.

महत्त्वाच्या बातम्या

'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget