नवी दिल्ली : पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करावी यासाठी त्यांच्या आईनं धाव घेतली आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण यांच्या सुटकेसाठी त्यांच्या आई अवंती जाधव यांनी केलेली याचिका भारतानं पाकिस्तानकडे सोपवली आहे.

कुलभूषण यांना भेटण्याचीही विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. आता पाकिस्तान संबंधित याचिकेवर कोणती भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान भारताचे पाकिस्तानातले उच्चायुक्त गौतम बंबावले यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची भेट घेऊन कुलभूषण जाधवांना भेटू देण्याची विनंती केली. मात्र पाकनं ती मागणी फेटाळली आहे. पाकिस्तानात हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तिथल्या लष्कराच्या न्यायालयानं कुलभूषण जाधवांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

भारतानं पाकिस्तानकडे केलेल्या चार मागण्या जाहीर केल्या आहेत.

काय आहेत भारताच्या चार मागण्या?

पहिली मागणी कुलभूषण जाधव यांची केस लढण्यासाठी भारताला वकिल नेमण्यास परवानगी द्यावी .

दुसरी मागणी या पूर्ण प्रकरणात पाकिस्तानात जी कारवाई करण्यात आली आहे, त्याचे लिखित दस्तऐवज भारताला देण्यात यावेत.

तिसरी मागणी कुलभूषण जाधव यांच्या परिवाराला त्यांना भेटण्याची परवानगी द्यावी. पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांच्या परिवाराला व्हिजा द्यावा.

चौथी मागणी कुलभूषण जाधव याच्या प्रकृतीविषयी भारताला संपूर्ण माहिती द्यावी.

कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा

‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

कोण आहेत कुलभूषण जाधव?

कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.

संबंधित बातम्या :


कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली


56 इंचाच्या छातीचं शौर्य दाखवण्याची हीच खरी वेळ : अशोक चव्हाण


कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा


हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक


कुलभूषण जाधव यांच्या मित्राशी बातचीत


कुलभूषण जाधवविरोधात निर्णायक पुरावे नाहीत, पाकची कबुली


कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडिओत 102 कट्स


हेरगिरी प्रकरणी अटकेतील कुलभूषण जाधवांचा कबुलीनामा ?


हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक


कुलभूषण जाधव यांच्याकडे दोन पासपोर्ट : पाकिस्तान


सर्व शक्ती पणाला लावा, पण कुलभूषण यांचा जीव वाचवा : ओवेसी


… तर आम्ही ही पूर्वनियोजित हत्या समजू, भारताने पाकला खडसावलं


भारताचा आक्रमक पवित्रा, पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका रद्द


हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक


सर्व शक्ती पणाला लावा, पण कुलभूषण यांचा जीव वाचवा : ओवेसी