एक्स्प्लोर
Advertisement
मोदींचा फुगा स्फोटक माहितीने फोडणार : राहुल गांधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फुगा फोडणारी स्फोटक माहिती माझ्याकडे आहे, त्यामुळे मला संसदेत बोलू दिलं जात नाही, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत, राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवरच थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले.
इतकंच नाही तर लोकसभेत पंतप्रधान मोदींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊ, असा दावाही राहुल गांधींनी केला.
गेल्या महिनाभरापासून विरोधक नोटबंदीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. मात्र पंतप्रधान घाबरल्यानं चर्चा करण्यासाठी तयार नाहीत असं राहुल गांधी म्हणाले.
तसंच मोदींनी आता कारणं देणं थांबवावं आणि चर्चेला सुरुवात करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
"नोटाबंदीवरुन विरोधक गेल्या महिनाभरापासून चर्चेची मागणी करत आहेत. मात्र सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चर्चेपासून पळ काढत आहेत. मोदी घाबरल्यानेच चर्चेला तयार नाहीत. मोदींचा फुगा फोडणारी स्फोटक माहिती माझ्याकडे आहे. ती माहिती मी लोकसभेत जाहीर करणार आहे. मात्र मला बोलूच दिलं जात नाही", असं राहुल गांधी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
राजकारण
पालघर
Advertisement