Paytm & Snapdeal: केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ई-कॉमर्स कंपनी पेटीएम मॉल आणि ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलला प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड मानकांशिवाय प्रेशर कुकर विकल्याबद्दल आकारून सिसीपीएने दोन्ही कंपन्यांना विकलेला माल पुन्हा परत मागवण्यास सांगितलं आहे. तसेच यासाठी ग्राहकांनी दिलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.


पेटीएम आणि स्नॅपडीलने खराब प्रेशर कुकर विकले 


सिसीपीएने दोन वेगळ्या आदेशांमध्ये Paytm Ecommerce Pvt Ltd (Paytm Mall) आणि Snapdeal Pvt Ltd यांना खराब प्रेशर कुकर विकल्याबद्दल दोषी ठरवले आहे. हे प्रेशर कुकर भारतीय मानक ब्युरो (BIS) मानकांनुसार नव्हते. तसेच हे प्रेशर कुकर डोमेस्टिक (गुणवत्ता नियंत्रण) ऑर्डर-2020 (QCO) नुसार नव्हते.


प्रेशर कुकरवर आयएसआय (ISI) मार्क नव्हते 
 
पेटीएम मॉलने प्रिस्टाइन आणि क्यूबन हे प्रेशर कुकर त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी ठेवले आहेत. मात्र यावर आयएसआय मार्क नाही. सिसीपीएने 25 मार्च रोजीच्या आपल्या आदेशात पेटीएम मॉलला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विकल्या गेलेल्या 39 प्रेशर कुकरच्या सर्व ग्राहकांना माहिती देण्यास आणि प्रेशर कुकर परत मागवण्यास सांगितले आहे. तसेच या ग्राहकांना त्यांचे पैसे परत करण्यास सागितले आहे. याशिवाय यासंदर्भातील अनुपालन अहवाल 45 दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे.


25 मार्च रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सिसीपीएने असे म्हटले आहे की, पेटीएम मॉलने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विकलेले हे सर्व खराब प्रेशर कुकर परत मागवावे आणि ग्राहकांना त्यांचे पैसे परत करावे. तसेच स्नॅपडीलला  ही त्यांनी विकलेले 73 प्रेशर कुकर परत मागवून ग्राहकांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :