काँग्रेसने तीन राज्यात मुसंडी मारली असली तरी मताधिक्य मात्र 2012 च्या निवडणुकांच्या तुलनेत कमी झाल्याचं चित्र आहे. कारण मणिपूर आणि गोवा या राज्यात सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलेल्या काँग्रेसपेक्षा भाजपचं मताधिक्य जास्त आहे.
उत्तर प्रदेश :
भाजपला 2012 च्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये 25 टक्के अधिक मताधिक्य मिळालं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या जनतेने सर्वात जास्त मतं भाजपच्या पारड्यात टाकली होती. तेच चित्र या निवडणुकीत पाहायला मिळालं.
भाजपला 2012 मध्ये 47 जागा आणि 15 टक्के मतं मिळाली होती. यावेळी 39.7 टक्के मतं आणि 312 जागा मिळाल्या.
काँग्रेसला 2012 मध्ये 11.5 टक्के मतं आणि 28 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी 6.2 टक्के मतं आणि केवळ 7 जागा मिळाल्या आहेत.
2012 मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या बसपाने 25.9 टक्के मतं आणि 80 जागा मिळवल्या होत्या. तर यावेळी 22.2 टक्के मतं आणि केवळ 19 जागांवर समाधान मानावं लागलं.
2012 साली समाजवादी पार्टी 29.1 टक्के मताधिक्क्यासह सत्तेत आली होती. त्यावेळी सपाने 224 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. तर यावेळी केवळ 47 जागा मिळाल्या तर 21.8 टक्के मतं मिळाली.
पंजाब :
सत्ताधारी अकाली दल-भाजप युती, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात त्रिशंकू लढत होईल, अशी शक्यता असताना काँग्रेसने सर्वांना धोबीपछाड देत पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली. मात्र 2012 च्या तुलनेत मताधिक्य कमी झालं आहे.
2012 साली काँग्रेसला 40 टक्के मतं आणि 46 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी 38.5 टक्के मतं आणि 77 जागा मिळाल्या.
अकाली दलला 2012 साली 35 टक्के मताधिक्य आणि 56 जागा मिळाल्या होत्या. यावेळी 25.2 टक्के मतं आणि केवळ 15 जागा मिळाल्या.
अकाली दलसोबत युती असलेल्या भाजपचंही मताधिक्य पंजाबमध्ये कमी झालं. 2012 साली 7 टक्के मताधिक्य आणि 12 जागा होत्या. तर यावेळी 5.4 टक्के मताधिक्य आणि केवळ 3 जागांवर विजय मिळवता आला.
उत्तराखंड :
उत्तराखंडमध्ये सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलेल्या भाजपला 2012 साली केवळ 33 टक्के मताधिक्य होतं. तर यावेळी 46.5 टक्के मतं मिळाली आहेत.
उत्तराखंडमध्ये भाजपला 33 टक्के मताधिक्य आणि 31 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी 46.5 टक्के मतं आणि 51 जागा मिळवल्या आहेत.
सत्ताधारी काँग्रेसाल 2012 साली 34 टक्के मताधिक्य आणि 32 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी फक्त 0.5 टक्के मतं मिळाली आणि 21 जागा मिळवता आल्या.
गोवा :
गोव्यात सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला. इथे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष झाला आहे. पण भाजपचं मताधिक्य काँग्रेसपेक्षा अधिक आहे.
भाजपला गोव्यात 2012 साली 34.7 टक्के मतं आणि 21 जागांवर विजय मिळाला होता. तर यावेळी 32.5 टक्के मतं आणि 13 जागांवर विजय मिळाला.
गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला 2012 साली 30 टक्के मतं आणि 9 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी 28.4 टक्के मताधिक्य आणि 17 जागा मिळाल्या आहेत.
मणिपूर :
मणिपूरमध्ये मताधिक्याच्या बाबतीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला भाजपने मात देत 36.3 टक्के मतं खेचून आणली.
मणिपूरमध्ये भाजपला 2012 मध्ये केवळ 2 टक्के मतं मिळाली होती, तर खातंही उघडता आलं नव्हतं. तर यावेळी 36.3 टक्के मताधिक्य आणि 21 जागांवर विजय मिळवला आहे.
2012 साली 42.4 टक्के मताधिक्य मिळवत सत्तेत विराजमान झालेल्या काँग्रेसच्या पारड्यात यावेळी मणिपूरच्या जनतेने केवळ 35.1 टक्के मतं टाकली आहेत. 2012 साली काँग्रेसने 42 जागांवर विजय मिळवला होता, तर यावेळी 28 जागा मिळवल्या.
संबंधित बातम्या :