भाजपने जे सर्वात मोठं सदस्य अभियान राबवलं होतं, त्या अभियानाचे सर्वेसर्वा दिनेश शर्मा हे होते.
भाजपच्या सनसनाटी विजयानंतर आपल्या घरात दिनेश शर्मा यांनी विजयाचं सेलिब्रेशन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकाऱ्यांच्या मेहनतीचा परिपाक म्हणजे उत्तर प्रदेशातील विजय आहे, असे दिनेश शर्मा म्हणाले.
दिनेश शर्मा यांनी आपल्या घराबाहेर सेलिब्रेशन करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगितले, "तुम्ही माझ्या नावाचा जयजयकार करण्याऐवजी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या नावाच्या घोषणा द्या."
दिनेश शर्मा यांची भाजपमधील 'क्लिन पर्सनॅलिटी' म्हणून ओळख आहे. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी दिनेश शर्मा यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे.
दिनेश शर्मा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही आशीर्वाद आहे. शिवाय, दिनेश शर्मा यांना भाजपच्या सदस्य अभियानाचं इन्चार्ज बनवलं, त्याआधी भाजपची सदस्यसंख्या केवळ 1 कोटी होती, मात्र दिनेश शर्माच्या प्रयत्नांनंतर तीच संख्या 11 कोटींवर पोहोचली. दिनेश शर्मा हे गुजरातमध्येही भाजपच्या प्रचार समितीचे इन्चार्ज होते.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर दिनेश शर्मा यांनी बोलणं टाळलं आहे. आपण पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहोत, असे शर्मा यांचे म्हणणे आहे. शिवाय, पुढचा मुख्यमंत्री कोण हे राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत ठरेल, असेही ते म्हणाले.