एक्स्प्लोर

मार्शल प्रकरणावरून राजकीय महाभारत, संसद भवन परिसरात कालच्या गोंधळाचा निषेध

राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह..पण याच वरिष्ठ सभागृहात झालेल्या अभूतपूर्व गदारोळानं या सदनाची प्रतिष्ठा खालावली आहे. आज दिवसभर यावरुन आरोप प्रत्यारोपाचं राजकारणही जोरात रंगलं होतं.

मुंबई : राज्यसभेत काल जो अभूतपूर्व गोंधळ झाला त्यानंतर सभागृह आहे की कुस्तीचा आखाडा असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. सभागृहात खासदारांऐवजी मार्शल्सची संख्या जास्त दिसत होती. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या गोंधळावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. 

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही काल 127 व्या घटनादुरुस्तीवर चर्चा झाली आणि विधेयक  देखील मंजूर झालं. चार आठवड्यांमध्ये हे एकमेव विधेयक होतं, ज्यासाठी विरोधक सहकार्य करायला तयार झाले होते. काल संध्याकाळी सहापर्यंत त्यामुळे सभागृह  ठीक चाललं होतं.पण हे विधेयक संपल्यानंतर सरकारनं विमा संशोधन विधेयकही मांडायला घेतलं आणि गदारोळ सुरु झाला.

 अनेक महिला खासदारांसमोर पुरुष मार्शल्स उभे केले गेले आणि पुरुष खासदारांसमोर महिला मार्शल्स उभे केले गेले. त्यामुळे महिला खासदारांना अपमानित केलं गेल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी केला आहे.  तर दुसरीकडे सरकारनं अशा पद्धतीचं कृत्य करुन नामर्दपणा केल्याचा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. 

आज दिवसभर या गोंधळाचे पडसाद जाणवत राहिले. एकीकडे विरोधकांनी राहुल गांधींच्या नेतृत्वात संसदेतून पायी मार्च करत निषेध केला.विरोधकांच्या एकत्रित बैठकीत राष्ट्रवादीकडून शरद पवार, शिवसेनेकडून संजय राऊतही सामील झाले.तर दुसरीकडे सत्ताधा-यांनी मात्र विरोधकांनाच जबाबदार धरलं गेलं. 

 संसदेचं अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्ट या काळापर्यंत प्रस्तावित होतं.पण सरकारनं ते दोन दिवस आधीच गुंडाळलं. त्यातही अशा अभूतपूर्व गोंधळातच या अधिवेशनाचा समारोप झालाय. जे झालं त्याला नेमकं जबाबदार कोण, त्यांच्यावर काही कारवाई होणार का याचं उत्तर तर मिळेलच पण यात देशाच्या संसदीय परंपरेला मात्र काळिमा फासली गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Sanjay Shirsat: मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'

Embed widget