विरोधी पक्षाने संख्याबळाची चिंता करु नये, विरोधी पक्षाचा शब्द आमच्यासाठी महत्त्वाचा : मोदी
संख्याबळाची चिंता विरोधी पक्षाने सोडावी. विरोधी पक्षाचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी मुल्यवान असेल. संसदेत आपण निष्पक्ष होऊन काम करु. यावेळी संसदेत जनतेच्या हिताचं अधिक काम होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली.
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. अधिवेशनच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्षाने संख्याबळाची चिंता करु नये, आपण नव्या उत्साहात एकत्रपणे काम करु, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.
जनतेने देशाची सेवा करण्याची आपल्याला आणखी एक संधी दिली आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संख्याबळाची चिंता विरोधी पक्षाने सोडावी. विरोधी पक्षाचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी मुल्यवान असेल. संसदेत आपण निष्पक्ष होऊन काम करु. यावेळी संसदेत जनतेच्या हिताचं अधिक काम होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली.
Prime Minister Narendra Modi arrives at the Parliament for 17th Lok Sabha, says, "The role of an active Opposition is important. Opposition need not bother about their numbers. I hope they will speak actively and participate in house proceedings." pic.twitter.com/OQfvlDxDuD
— ANI (@ANI) June 17, 2019
देशातील नागरिकांच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करु. आज नवीन खासदारांचा परिचय होणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालं. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाण मतदान केलं. अनेक दशकांनंतर एका सरकारला बहुमताने जनतेने सलग दुसऱ्यांना निवडूण दिलं. त्यामुळे जनतेचा विश्वास आम्ही पूर्ण करु आणि आगामी पाच वर्षात देशहिताचे निर्णय घेऊ, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
Prime Minister Narendra Modi at the Parliament: Today, a new session is starting, there are new hopes and dreams with the beginning of this session. Since independence ,this Lok Sabha elections saw highest number of women voters and women MPs. pic.twitter.com/YGGGDInX99
— ANI (@ANI) June 17, 2019
योग्य पद्धतीने सरकारवर टीका केल्याने लोकशाही बळकट होते, त्याचे संसदेत सकारात्मक परिणाम झालेले दिसतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. त्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असं वेगळं काम करण्यापेक्षा देशहितासाठी काम करण्याचं आवाहनही नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं.