Parliament Session 2024: राहुल गांधींच्या (Rahul Gandhi)   वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राडा झाला.  त्याच वक्तव्याला संसदेत थेट पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि अमित शाहांनीही (Amit Shah) आक्षेप घेतला..  राहुल गांधींनी संसदेत भगवान महादेवाचं चित्र दाखवलं. त्रिशूळ हे हिंसेचं नसून अहिंसेचं प्रतीक आहे असं राहुल गांधींनी सांगितलं.. राहुल गांधींनी गुरुनानक यांचंही चित्र दाखवलं.. ज्याला भाजपच्या खासदारांनी आक्षेप घेतला..भगवान महादेव आणि गुरुनानक हे ''डरो मत" असं सांगतात.. पण स्वत:ला हिंदू म्हणवणारे देशात हिंसा पसरवतात असा टोला राहुल गांधींनी भाजपला लगावला. याला पंतप्रधान मोदी, अमित शाहांसह भाजपच्या सर्वच खासदारांनी आक्षेप घेतला.


राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला.. यावेळी त्यांनी संविधान हातात पकडून बोलण्यास सुरूवात केली.  पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरूवात केली. खोटे खटले चालवल्याचा आरोप केला.  ईडी चौकशीचाही उल्लेख केला. इंडिया आघाडीच्या नेत्यांना जेलमध्ये डांबलं पण अशावेळी सरकारशी लढण्याची हिंमत कशी आली? हे सांगताना  राहुल गांधींनी भगवान शंकर, महावीर, गुरुनानक, येशू अशा विविध धर्माच्या देवांचे फोटो हातात घेतले. हे सर्व 'डरो मत' असं सांगतात.. असं म्हंटलं. अशातच त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. स्वतःला हिंदू म्हणवणारे लोक दिवसरात्र हिंसा आणि द्वेष पसरवतात'.. आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद पेटला. स्वत: पंतप्रधान मोदींनीही उभे राहून विरोध दर्शवला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर बाब असल्याचे सांगितले... तर राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी गृहमंत्री अमित शाहांनी केली.


भाजपच्या पराभवावरुन राहुल गांधींनी भाजपला टोले


अयोध्या लोकसभा मतदारसंघात झालेल्या भाजपच्या पराभवावरुन राहुल गांधींनी भाजपला टोले लगावले. राहुल गांधींनी अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांना संसदेत आपल्या शेजारी बसवलं. अवधेश प्रसाद हे समाजवादी पार्टीचे खासदार आहेत. अवधेश प्रसाद यांच्याशी राहुल गांधींनी हस्तांदोलनही केलं याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आक्षेप घेतला. संसद ही हस्तांदोलन करण्याची जागा नाही. संसदेचं कामकाज नियमानुसारच व्हायला हवं अशी मागणी अमित शाहांनी केली..




अयोध्या लोकार्पण सोहळ्यावर टीका


अयोध्येत सरकारनं गोरगरिबांच्या जमिनी घेतल्या पण त्यांना एक रुपयाचाही मोबदला दिला नाही असा आरोप राहुल गांधींना केला.  राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अदानी-अंबानी उपस्थित होते पण अयोध्येतल्या नागरिकांना याचं निमंत्रण नव्हतं असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर स्वत: पंतप्रधान मोदी बोलायला उभे राहिले,  राहुल गांधींनी गंभीरपणे वागावं असा टोला मोदींनी लगावला.. 


अग्निवीर योजनेवरुनही राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना घेरलं 


सैन्यातल्या अग्निवीर योजनेवरुनही राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना घेरलं.  अग्निवीरांना शहिदांचा दर्जा का देत नाही असा सवाल राहुल गांधींनी विचारला. शहीद झालेल्या अग्निवीरांच्या कुटुंबांना मोबदलाही दिला जात नसल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधींच्या आरोपांवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर दिलं. राहुल गांधी खोटं बोलतायत असं राजनाथ म्हणाले.. राहुल गांधींनी सभागृहाची दिशाभूल करु नये असं प्रत्युत्तर अमित शाहांनी दिलं..