नवी दिल्ली : दरवेळी महागाई वाढली असे शब्द आपण ऐकतो, पण यावेळी बातमी आहे खासदारांच्या वेतनवाढीची. संसदेच्या आजी-माजी खासदारांचे वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. मार्च एंडिंग जवळ आलं की सर्व पगारदारांना आपल्या वेतन वाढीचे वेध लागतात. सर्वसामान्य पगारदारांचं वेतन वाढेल की नाही माहिती नाही. मात्र, देशातील राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांचं वेतन तब्बल 24 टक्क्यांनी वाढलं आहे.
खासदारांच्या वेतनात किती वाढ होणार?
खासदारांचं दरमहा वेतन
पूर्वी: ₹1,00,000 रुपये
आता: ₹1,24,000 रुपये
दैनिक भत्ता (संसद सत्रादरम्यान संसदेत हजर राहिल्यास)
पूर्वी: ₹2,000 रुपये प्रति दिवस
आत्ता: ₹2,500 रुपये प्रति दिवस
माजी खासदार दरमहा वेतन
पूर्वी: ₹25,000 रुपये
आता: ₹31,000 रुपये
अतिरिक्त पेंशन (प्रत्येक वर्षी एका कार्यकाळानंतर)
पूर्वी: ₹2,000 रुपये महिना
आता: ₹2,500 रुपये महिना
टिकाऊ फर्निचर (प्रत्येक कार्यकाळात)
पूर्वी: ₹ 80 हजार रुपये प्रत्येक महिन्यात
आता: ₹1 लाख रुपये प्रति माह
गैरटिकाऊ फर्निचर (एक कार्यकाळ)
पूर्वी: ₹ 20 हजार प्रति माह
आता: ₹ 25 हजार प्रति माह
यापूर्वी एप्रिल 2018 मध्ये खासदारांच्या वेतनात आणि भत्त्यात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता नव्यानं वाढ करण्यात आली आहे. ही पगार वाढ करताना महागाई इंडेक्स विचारात घेतला जातो. त्यामुळं पूर्वलक्षी प्रभावाने, 1 एप्रिल 2023 पासून ही वाढ देण्यात आली आहे.
बाहेर कोणतेही खासदार वेतनवाढीचे उघड समर्थन करत नाहीत. पण सभागृहात कुणीही विरोध केलेला नव्हता. त्यामुळे अनेक मुद्द्यांवर रोज वाद घालणाऱ्या खासदारांचे स्वत:च्या वेतनवाढीबाबत मात्र एकमत झालं असं म्हणाव लागेल .
खासदारांना मिळणाऱ्या इतर सुविधा
- मोफत इंटरनेट आणि फोन सुविधा.
- दरवर्षी 34 वेळा देशांतर्गत विमान प्रवास.
- फर्स्ट क्लासमध्ये कोणत्याही वेळी मोफत रेल्वे प्रवास.
- रस्ते प्रवासासाठी इंधन खर्चाची भरपाई.
- दरवर्षी 50,000 युनिट वीज आणि 4,000 किलोलीटर पाणी मोफत.
- खासदारांना मतदारसंघातील खर्चासाठी प्रतिमहा 70 हजार रुपये.
- कार्यालयीन भत्ता 60 हजार रुपये
- दिल्ली मध्ये सरकारी निवासस्थान.
- मोफत आरोग्य सेवा
- संसदेत कॅन्टीन अल्पदरात जेवण
स्वातंत्र्यानंतर 250 टक्क्यांनी वाढ
सन 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात मोठी गरीबी होती. तेव्हा खासदारांना साधारण 400 रुपये महिना मानधन दिलं जात होतं. त्यानंतर खासदारांचं वेतनात 1962 ला 100 रुपयांची वाढ करत 500 रुपये करण्यात आलं. त्यानंतर टप्प्याटप्याने खासदारांच्या वेतनात वाढ करण्यात आली.
अलीकडच्या काळाचा विचार केला तर 2006 ला खासदाराचं वेतन 16 हजार करण्यात आलं. 2009 ला मोठी वाढ करत खासदारांच्या वेतन 50 हजार करण्यात आलं. तर 2018 ला यामध्ये आतापर्यंत सर्वांत मोठी म्हणजे दुपटीने वाढ करत 1 लाख रुपये करण्यात आली. त्यानंतर 2025 ला खासदारांच्या वेतनात 24 टक्के वाढ करत 1 लाख 24 हजार करण्यात आलं. स्वातंत्र्य प्राप्तीपासून खासदारांच्या वेतनात 250 पट वेतनवाढ करण्यात आली आहे.
हे झालं आपल्या लोकशाहीच्या लोकप्रतिनिधींच्या वेतन वाढीबाबत. मार्च एन्ड असल्यामुळं वेतन वाढीची आशा तुमच्या मनात नक्की असेल ती आशा कायम जीवंत राहो. त्यासाठी सर्वांनाच शुभेच्छा.
ही बातमी वाचा: