नवी दिल्ली : रायगडावर दंतकथेतून तयार झालेले स्मारक हटवावं असं पत्र मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. आज मी पुरातत्त्व खात्याच्या महासंचालकाची भेट घेतली असून आरटीआयमध्ये लिहिलं आहे की पुरातत्त्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून मागे कुत्र्याचे स्मारक रायगडवर नाही. पुरातत्त्व विभागाने कोणत्याही प्रकारे संरक्षक संरक्षित स्मारक म्हणून कुत्र्याच्या समाधीला संरक्षण दिलेले नाही, अशी माहिती माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आज नवी दिल्लीमध्ये बोलताना दिली. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे. यासंदर्भाने त्यांनी आज दिल्लीमध्ये पुरातत्त्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली व या संदर्भातील माहिती दिली. 

आपण वाघा कुत्र्याच्या स्मारकाचे स्थलांतर करू शकतो. मी कोणत्याही प्रकारे अल्टिम दिलेला नाही. 31 मे पर्यंत गडकिल्ल्यांवर अतिक्रमण काढून टाका ही राज्य शासनाचे धोरण आहे. स्मारकाचं काय करायचं ते ठरवावं असं संभाजी राजे म्हणाले. 

कुत्र्याने उडी मारल्याचा कोणताही संदर्भ नाही

संभाजीराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांना अग्नी दिला तेव्हा कुत्र्याने उडी मारल्याचा कोणताही संदर्भ नाही. लोकमान्य टिळकांनी जिर्णोद्धार केला तेव्हा शिवभक्तानी वर्गणी गोळा केली. एकाही इतिहासकाराने म्हटले नाही की आमच्याकडे पुरावे आहेत. सगळ्या इतिहासकारांना राज्य सरकारने बोलवावे अशी मागणी सुद्धा संभाजीराजे यांनी केली. ते म्हणाले की जे विरोध करतात त्यांनाही बोलवावे. वाघा कुत्र्याच्या स्मारकाची उंची शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा उंच असल्याचे संभाजी राजे छत्रपती यांनी सांगितले. 

कुत्र्याच्या समाधीसाठी ते कसे पैसे देतील?

दुर्दैवाने, तुकोजी होळकर महाराजांचे नाव त्या ठिकाणी जोडले जात आहे. मात्र, ते म्हणाले की कुत्र्याच्या समाधीसाठी ते कसे पैसे देतील? तुकोजी महाराज शिवभक्त होते, तर कृष्णराव केळुसकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत तुकोजी होळकर यांनी विकत घेऊन देशभरातील ग्रंथालयांना वाटल्याचे संभाजीराजे म्हणाले. होळकर आणि छत्रपती घराण्याची जवळचे संबंध होते. धनगर समाज विश्वास ठेवणारा असल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या