Parliament Monsoon Session Live: मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाला सुरूवात

Parliament Monsoon Session Live: मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे.

abp majha web team Last Updated: 08 Aug 2023 04:40 PM
अविश्वासदर्शक ठरावात राहुल गांधी यांच्याकडून पहिले भाषण नाही; काँग्रेसकडून रणनीतीत बदल

राहुल गांधी यांच्या भाषणाबाबत काँग्रेसकडून अचानक रणनीतीमध्ये बदल


पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नसल्याने राहुल गांधी यांनी पहिलं भाषण केलं नाही


ज्या दिवशी मोदी सभागृहात त्याच दिवशी राहुल गांधी भाषण करण्याची शक्यता

अविश्वासदर्शक ठरावात राहुल गांधी यांच्याकडून पहिले भाषण नाही; काँग्रेसकडून रणनीतीत बदल

राहुल गांधी यांच्या भाषणाबाबत काँग्रेसकडून अचानक रणनीतीमध्ये बदल


पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नसल्याने राहुल गांधी यांनी पहिलं भाषण केलं नाही


ज्या दिवशी मोदी सभागृहात त्याच दिवशी राहुल गांधी भाषण करण्याची शक्यता

लोकसभेतल्या अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत महाराष्ट्रातल्या राजकीय संघर्षाचं प्रतिबिंब

शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातल्या कारभाराचे वाभाडे यानिमित्तानं सभागृहात काढले. मुख्यमंत्री यांनी घरी बसून काम करण्याचा एक रेकॉर्डच केला अशी टीका त्यांनी केली. तर खासदार अरविंद सावंत यांनी नंतर पळपुट्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका तर करत त्याला प्रत्युत्तर दिलं. श्रीकांत शिंदे महाराष्ट्रातल्या राजकारणावरुन बोलत असताना समोरच्या बाकावरुन त्यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवण्याचं चँलेज आलं, त्यावर त्यांनी सभागृहातच हनुमान चालिसा ऐकवली. शिंदे ठाकरे गटाच्या या जुगलबंदीत नंतर भर पडली ती नारायण राणे यांच्या भाषणानं. राज्यसभेचे सदस्य असले तरी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांना या भाषणात बहुदा या प्रत्युत्तरासाठीच छोटीशी संधी दिली होती. भाषणं ऐकून महाराष्ट्राच्या विधानसभेत असल्यासारखं वाटतंय असं म्हणत नंतर त्यांनी शिवसेना, ठाकरे या विषयावरच तोफ डागली.

No Confidence Motion Live : राहुल गांधी बोलणार असं समजलं होतं, पण ते आले नाही, कदाचित त्यांना उशिरा जाग आली असावी, निशिकांत दुबे यांचा टोला

No Confidence Motion Live : अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी येणार असल्याचं आम्हाला समजलं होतं. मात्र ते आले नाहीत. कदाचित उशिरा जाग आली असेल, असा टोला भाजप खासदार  निशिकांत दुबे यांनी लगावला. गौरव गोगई यांनी प्रथम चर्चा सुरू केली ही चांगली गोष्ट आहे. 'मी अविश्वास ठरावाच्या विरोधात उभा राहिलो आहे. मणिपूरची चर्चा झाली. एवढ्या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी पक्षाने मला उभे केले, असंही निशिकांत दुबे म्हणाले. 

No Confidence Motion Debate:  संसद टीव्हीच्या चॅनलखाली चालणाऱ्या मजकुरावर विरोधकांचा आक्षेप, दुबेंच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ

No Confidence Motion Debate:  भाजपकडून संसदेत निशिकांत दुबे जेव्हा पहिल्यांदा बोलण्यास उभे राहिले तेव्हा विरोधाकांनी गोंधळ केला. कारण संसद टीव्हीत अविश्वास प्रस्तावाची चर्चा सुरू असताना खाली सरकारच्या आजवरच्या कामगिरीचे टिकर चालत होते.  त्याबद्दल विरोधकांनी आक्षेप नोंदवला, जोपर्यंत ते टिकर हटवले जात नाहीत तोपर्यंत सभागृहाचे कामकाज  बंद राहील अशी भूमिका विरोधकांनी घेतली. 

No Confidence Motion Live : अदानी प्रकरणावरही पंतप्रधानांचं मौन, चूक मान्य केली नाही : गौरव गोगोई

No Confidence Motion Live : काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, "पंतप्रधान मोदी केवळ मणिपूरवरच नव्हे तर अदानी मुद्द्यावरही मौन बाळगून आहेत. चीनबाबतही मौन सोडलं नाही. पंतप्रधान मोदी त्यांची चूक मान्य करत नाहीत."

No Confidence Motion Live : मणिपूरमध्ये त्यांचे डबल इंजिन सरकार अपयशी ठरलं हे पंतप्रधानांनी स्वीकारले पाहिजे : गौरव गोगोई

No Confidence Motion Live : काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, 'पंतप्रधानांना हे मान्य करावे लागेल की त्यांचं डबल इंजिन सरकार, मणिपूरमधील त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये 150 लोकांचा मृत्यू झाला. सुमारे 5000 घरे जाळली गेली, सुमारे 60,000 लोक मदत शिबिरात आहेत आणि सुमारे 6500 एफआयआर नोंदवले गेले आहेत. ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संवादाचे, शांततेचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करायला हवे होते, त्यांनी गेल्या दोन-तीन दिवसांत चिथावणीखोर पावलं उचलल्याने समाजात तणाव निर्माण झाला आहे.

No Confidence Motion Live : अमित शाह मणिपूरला गेले, मग मोदी का नाही जात? गौरव गोगोईंचा सवाल

No Confidence Motion Live : मणिपूर जळतंय म्हणजे भारत जळतोय, अमित शाह मणिपूरला गेले, मग मोदी का नाही जात?' असा सवाल काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी संसदेत उपस्थित केला.

No Confidence Motion Live : अविश्वास प्रस्तावावर विरोधकांकडून कोण कोण बोलणार?

No Confidence Motion Live : अविश्वास प्रस्तावावर विरोधकांकडून कोण कोण बोलणार?


गौरव गोगोई (काँग्रेस)


राहुल गांधी (काँग्रेस)


मनीष तिवारी (काँग्रेस)


अधीर रंजन चौधरी (काँग्रेस)


सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)


काकोली सेन (TMC)


सौगता रॉय (TMC)


कनिमोळी (द्रमुक)

पार्श्वभूमी

 Parliament Monsoon Session Live: मणिपूरच्या (Manipur Violence) मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणला आहे. त्यावर आज दुपारी 12 वाजल्यापासून चर्चा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चर्चेची सुरुवात राहुल गांधींपासून (Rahul Gandhi) होण्याची शक्यता आहे. राहुल यांना सोमवारीच खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. त्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी त्यांचं संसद भवनात जल्लोषात स्वागत केलं. दरम्यान, याच मुद्द्यावर पंतप्रधान मोदी गुरुवारी उत्तर देणार आहेत. दरम्यान या मुद्द्यावर राहुल गांधी काय बोलणार याकडे सध्या लक्ष लागलंय. तसंच आज राहुल गांधी कोणावर निशाणा साधणार हेही पाहणे महत्त्वाचं असणार आहे.


 मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव असणार आहे.एनडीएकडे 332 चं संख्याबळ आहे. सरकारला धोका तर नाहीय, पण तरी सभागृहातल्या चर्चेला मात्र सरकारला अखेर सामोरं जावं लागणार आहे. मणिपूरच्या मुद्दयावर पंतप्रधान मोदी बोलायला तयार नसल्यानं या अविश्वास प्रस्तावाची रणनीती काँग्रेस आणि विरोधकांकडून आखली गेली आहे. मणिपूरच्या मुद्दयावर अनेक दिवसांपासून संसदेत गदारोळ सुरु होता.  विरोधक पंतप्रधानांच्याच उत्तरासाठी आग्रही होते. अविश्वास प्रस्तावावर उत्तर पंतप्रधानांनाच द्यावं लागतं, त्यामुळे यानिमित्तानं पंतप्रधानांनाच उत्तर देण्यास भाग पाडण्याची रणनीती आखली गेली आहे.


मोदी सरकारविरोधात 2014 नंतर आलेला हा दुसरा अविश्वास प्रस्ताव आहे. याआधी 2018 मध्ये टीडीपी सरकारनं अविश्वास प्रस्ताव आणला होता. 


कसा सादर होणार अविश्वास प्रस्ताव?



  • अविश्वास प्रस्तावासाठी किमान 50 खासदारांच्या सह्यांचं अनुमोदन असेल तर कुणीही सदस्य अशी नोटीस दाखल करु शकतो 

  •  सकाळी दहा वाजण्याच्या आधी अशी नोटीस दाखल झाली तर त्याच दिवशी सभागृहाच्या पटलावर ती स्वीकारावी लागते

  • त्यानंतर लोकसभा अध्यक्ष त्या प्रस्तावावर चर्चेसाठी वेळ आणि तारीख निश्चित करतात

  • अविश्वास प्रस्तावार मतदान होत असताना जर विरोधकांचं बहुमत दिसलं तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो

  • स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत 27 वेळा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला गेलाय, बहुतांश वेळा तो बहुमतानं फेटाळलं गेलाय

  • अपवाद 1979 मध्ये मोरारजी देसाई आणि 1999 मध्ये वाजपेयींच्या सरकारचा भाजपकडे स्वत:चे 303, एनडीएकडे 332 खासदारांचं पाठबळ आहे.

  • त्यामुळे सरकारला धोका नाही हे तर स्पष्ट आहे. फक्त या निमित्तानं सभागृहात पंतप्रधानांना उत्तरास भाग पाडण्याची नीती यशस्वी होत आहे. मागच्या वेळी 2018 मध्ये मोदी सरकारला 330 खासदारांनी पाठिंबा देत अविश्वास प्रस्ताव हाणून पाडला होता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.